शिर्डी, 10 डिसेंबर: सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास पुण्यातील (Gun firing in pune) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात गोळीबाराची एक थरारक घटना समोर आली होती. याठिकाणी एका तरुणाने बांधकाम व्यवसायिकाची भर रस्त्यावर गोळ्या घालून हत्या केली होती. आरोपीनं मृत तरुणाच्या जवळ जात त्याच्यावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या होत्या. या खळबळजनक घटनेत तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. गोळीबाराची ही घटना ताजी असताना, महाराष्ट्राला हादरवणारी गोळीबाराची आणखी एक घटना समोर आली आहे.
शिर्डीतील लक्ष्मीनगर भागात एका खाजगी पार्किंगमध्ये एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला (Gun firing in shirdi) आहे. या दुर्दैवी घटनेत शिर्डी शहरातील युवक सूरज ठाकूर हा गंभीर जखमी (Young man injured) झाला आहे. भल्या पहाटे गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या आवाजामुळे अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, संबंधित तरुण घटनास्थळी गंभीरावस्थेत पडला होता.
ही घटना उघडकीस येताच स्थानिकांनी सूरजला तातडीने शिर्डीतील साईबाबा सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. भल्या पहाटे गोळीबार घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून जखमी सूरज याच्यावर उपचार केले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा-Nagpur:आईला मारहाण करणाऱ्या तरुणाला नियतीनं दिली शिक्षा; पोलीस ठाण्यातच झाला अंत
हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. हल्ल्यामागच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही पुरावे सापडतात का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmedabad, Crime news, Gun firing