साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहमदनगर 19 जुलै : अहमदनगरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात प्रियकराने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने शहरातील एका महिलेनं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी महिलेला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या कारणावरून शेवगाव पोलिसांनी प्रियकर आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेनं आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या महिलेनं पतीशी फारकत घेतली होती. यानंतर तिचे प्रशांत गुटे नावाच्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. तो महिलेच्या घरी येत जात होता. प्रशांत गुटे याने तिथेच महिलेचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ काढले. दरम्यान गुटे याचे अन्य एका महिलेसोबतही प्रेमसंबंध होते. 2 मित्रांची सोबतच ट्रेनसमोर उडी घेत संपवलं आयुष्य; छ. संभाजीनगरमधील हादरवणारी घटना त्या महिलेने संबंधित महिलेचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ महिलेच्या भावाला पाठवले. त्यानंतर त्यांनी भावाला घरी बोलावलं. मात्र त्याने येण्यास नकार दिला. यानंतर तुमची बदनामी करेल, अशी धमकी दोघांनी महिलेच्या भावाला दिली. भावाने त्या व्हिडिओमध्ये बहिणीला विचारणा केली. मात्र या सगळ्या प्रकरणाबद्दल समजताच संबंधित महिलेनं आत्महत्या केली आहे. याप्रकरणी महिलेचा प्रियकर प्रशांत गुटे आणि त्याची दुसरी प्रेयसी असलेल्या आरोपी महिलेच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.