जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sujay Vikhe Patil : कारखाना चालवताना कुटुंबाची ओढाताण, भाजप खासदार सुजय विखे पाटील झाले भावुक

Sujay Vikhe Patil : कारखाना चालवताना कुटुंबाची ओढाताण, भाजप खासदार सुजय विखे पाटील झाले भावुक

सुजय विखे पाटील झाले भावुक

सुजय विखे पाटील झाले भावुक

निवडणूक निकालानंतर मात्र विरोधकांच्या डोळ्यात अश्रू येतील कारण विखे पाटील कुणाची उधारी ठेवत नाहीत आम्ही व्याजासह परत करतो असा इशारा सुजय विखे यांनी दिलाय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

हरीष दिमोटे, अहमदनगर/ शिर्डी, 16 जून : राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराची सांगता झाली. या सांगता सभेत बोलताना भाजपचे खासदार सुजय विखे भावूक झाल्याचं बघायला मिळालं. कारखाना चालवताना कुटुंबाची होणारी ओढाताण आणि मुलगी विचारत असलेल्या प्रश्नाबाबत बोलताना खासदार सुजय विखे यांना अश्रू अनावर झाले होते. निवडणूक निकालानंतर मात्र विरोधकांच्या डोळ्यात अश्रू येतील कारण विखे पाटील कुणाची उधारी ठेवत नाहीत आम्ही व्याजासह परत करतो असा इशारा सुजय विखे यांनी दिलाय. गणेश कारखाना निवडणुकीत विखे पाटलांच्या विरोधात बाळासाहेब थोरात आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाचा पॅनल रिंगणात आहे. 17 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून १९ तारखेला निकाल जाहीर होणार आहे..

जाहिरात

गणेशनगर कारखान्याची निवडणूक प्रतीष्ठेची नाही तर ही निवडणूक माणूसकीची विश्वासाचीआहे. तुमचा प्रपंच चालावा म्हणून प्रवरा कारखान्याने त्याग केला असं सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले. मुलीबद्दल आणि कुटूंबा बद्दल बोलताना सुजय विखे पाटील भावुक झाले. ते म्हणाले की, निवडणूकीत पाडण्यासाठी अदृश्य हात असतात. मात्र आपण निवडून यावे यासाठी अदृश्य हात काम करताहेत. त्यांचा नामोल्लेख मी आत्ता करू शकत नाही पण त्यांच्या उपकाराची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात बोगस बियाणे विक्री प्रकरणी धक्कादायक खुलासा, गुजरात कनेक्शन आलं समोर   बाजूच्या लोकांना आपला उत्कर्ष सहन होत नाही. त्यांच्या मनात द्वेष आणी मत्सराची भावना आहे. ज्यांचा गणेशनगर कारखान्याशी संबध नाही ते इकडे येऊन भाषण करताहेत.जेव्हा कारखाना विकायला काढला होता तेव्हा तुमच्या कारखान्याने टेंडर का भरले नाही? आम्ही आठ वर्ष कारखाना चालवला आणि कामगारांचे पगारही केले. तुम्ही कारखाना बंद पाडला मात्र आम्ही चालवला. ही निवडणूक तुमच्यासाठी फक्त बगलबच्चे वाचवण्यासाठी असून मी गणेशनगर कारखान्याला कर्ज मिळवण्यासाठी स्वतःची प्राॅपर्टी गहाण ठेवली थोरात आणि कोल्हेची दानत आहे का? ते केवळ लुटायला बसलेय अशी घणाघाती टिका विखे पाटलांनी थोरातांवर केलीय. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही बाळासाहेब थोरात आणि कोल्हेंना इशारा देताना म्हटलं की, गणेशनगर कारखाना खाजगी होवू नये यासाठी फक्त चालवायला घेतला. आम्ही राजकारणात मोकळेपणाने काम करतो. आता मात्र तुम्हाला आणि कोपरगावकरांना माफी नाही असं म्हणत बाळासाहेब थोरात आणि कोल्हेंना विखेंनी सुचक इशारा दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात