मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बागेश्वर धाम शास्त्रींचे साईबाबांसंदर्भात वक्तव्य, शिर्डीत निषेधाची लाट

बागेश्वर धाम शास्त्रींचे साईबाबांसंदर्भात वक्तव्य, शिर्डीत निषेधाची लाट

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Shirdi, India

हरीष दिमोटे, प्रतिनिधी

शिर्डी (अहमदनगर), 2 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी निषेध केला आहे. तसेच धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तर यासोबतच राधाकृष्ण विखे पाटील यांनी धीरेंद्रशास्त्री वर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यासह देशात साईभक्तांमध्ये तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. शिर्डी ग्रामस्थांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. साईबाबा देव आहेत की नाही यासाठी धीरेंद्र शास्त्रीच्या प्रमाणपत्राची गरज नाही असं म्हटले आहे. धीरेंद्र शास्त्रींनी एकदा साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत यावे, त्यांची अक्कल ठिकाणावर येईल, अशा भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

Indian Railway: रेल्वेत ज्येष्ठांना मिळतील 'या' सुविधा, रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली माहिती

साईबाबांनी त्यांच्या हयातीत वैदिक परंपरा जपल्या. त्यामुळे साई संस्थानकडून साई मंदिरात आजही वैदिक परंपरा जपल्या जातात. साईबाबांना नावं ठेवणारी अनेक लोकं आजपर्यंत आली गेली. मात्र, आम्ही बाबांच्या शिकवणूकी प्रमाणे चालतो. धीरेंद्र शास्त्रीने महाराष्ट्राची संत परंपरा समजून घ्यावी आणि साईभक्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करू नये, असा सल्ला साई मंदिराचे सेवानिवृत्त मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी धीरेंद्र शास्त्रींना दिला आहे.

यासोबतच शिर्डी मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धीरेंद्र शास्त्री सामाजिक शांतता बिघडवत असून साईभक्तांच्या भावना दुखावत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या थोतांड बाबा विरोधात गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Sai Baba Of Shirdi (Deity), Shirdi, Shirdi news, Shirdi sai baba sansthan