सुनिल दवंगे, शिर्डी 30 ऑक्टोबर : साईबाबांच्या दरबारी सोने - चांदी दानस्वरुपात येणं आता नवीन काही राहील नाही. मात्र हैद्राबाद मधील एका महिला साईभक्तानं सोन्याचं अनोख दान बाबांना देवू केल आहे. पोलावर्नम कल्याणी या महिला भाविकाने आपल मंगळसूत्रातील सोन्यापासून सुवर्णहार करून बाबांना अर्पण केला आहे. वरिष्ठ आयएएस पतिच्या निधनानंतर स्त्रीधन बाबांच्या चरणी अर्पण करत सुवर्णहार स्वरुपात बाबांच्या चरणी दान दिला आहे. साईसंस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सुवर्ण हार स्विकारला असून मध्यान्ह आरती नंतर बाबांच्या मुर्तीला चढवण्यात आला आहे.
साईंच्या दरबारी एक रुपयांपासून ते सव्वाशे कोटी रुपयांच दान बाबांच्या झोळीत टाकणारे भाविक येत असतात. साई समाधीचं दर्शन घेवून आपल्या इच्छाशक्ती नुसार बाबांना दान देतात. अलिकडच्या काळात बाबांना सोन्याच दान देणाऱ्या भाविकांची संख्या वाढताना दिसते.
हे ही वाचा : तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय; वैवाहिक आयुष्यातील समस्या होतील दूर
हैद्राबाद येथिल महिला भाविक पोलावर्मन कल्यानी यांनी आपले मंगळसूत्र आणि स्रीधन मोडून त्यातून साईबाबांसाठी आकर्षक सुवर्ण हार तयार केला. पोलावर्मन कल्याणी ह्या साईबाबांच्या निस्सिम भक्त आहेत. त्याचे पती वरिष्ठ आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत होते. पं बंगाल मध्ये अतिरिक्त चीफ सेक्रटरी या पदावर त्यांनी काम केले. सेवानिवृत्ती नंतर कोविडच्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर आपण सोने अलंकार वापरणार नाही असा निश्चिय पी कल्याणी यांनी केला, आणि आपल्याकडील सर्व स्रीधन मोडून त्या सोन्यातून सुंदर आणि आकर्षक सुवर्ण हार तयार केला.
150 ग्रॅम वजनाचा अत्यंत सूबक कारागिरी केलेल्या हाराच्या निव्वळ सोन्याची किमंत सात लाख दहा हजार रुपये असून पी कल्याणी यांनी तो संस्थानकडे सपुर्द केला आहे. साईबाबाच्या मध्यान्ह आरती नंतर सुवर्णहार बाबांना घालण्यात आला.
हे ही वाचा : नोव्हेंबर महिन्यातील सर्व सण-उपवासांची ही पहा यादी, वर्षातील शेवटचे चंद्रगहण पण आहे
यावेळी बोलताना साईभक्त पी कल्याणी यांनी सांगीतले की, माझे पती देखिल बाबांचे भक्त होते. कोविड मध्ये ते बाबांच्या चरणी गेले आहेत. पती गेल्यानं आता मंगळसूत्र आणि इतर सुवर्ण अलंकार मी वापरू शकत नाही. त्यामुळे हे सर्व सोने मोडून त्यापासून साईबाबांसाठी सुवर्ण हार तयार केला आहे. माझ्या पतीने केलेल्या सोन्याच्या अलंकावर आता बाबांचा अधिकार असून मी वापरलेल्या सोने साईंच्या चरणावर अर्पण केल्यानं समाधान वाटत आहे.