मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

स्कॉर्पिओ आणि अल्टोची समोरासमोर धडक, देवीचे दर्शन घेऊन परतणारे 2 भाविक जागीच ठार

स्कॉर्पिओ आणि अल्टोची समोरासमोर धडक, देवीचे दर्शन घेऊन परतणारे 2 भाविक जागीच ठार

हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये अल्टो कारचा चुराडा झाला.

हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये अल्टो कारचा चुराडा झाला.

हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये अल्टो कारचा चुराडा झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagardeole, India

अहमदनगर, 01 ऑक्टोबर : मोहटादेवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दोन भक्तांवर काळाने घाला घातला. औरंगाबाद-बारामती राज्य मार्गावर भरधाव स्कॉर्पिओ आणि अल्टो कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

पाथर्डी तालुक्यातील काळेगाव शिवारात औरंगाबाद बारामती राज्य मार्गावर शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मारुती अल्टो कारमधील भाविक हे त्यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील चित्ते पिंपळगाव या ठिकाणी मोहटा देवीचे दर्शन घेऊन जात होते. तर अमरापूर कडून एक भरधाव स्कॉर्पिओ गाडी येत होती.

काळेगाव शिवारात पोहोचले असता स्कॉर्पिओ गाडीने अल्टो कारला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये अल्टो कारचा चुराडा झाला.

या अपघातात अल्टो कारमधील अप्पासाहेब रंगनाथ गावंडे, गंगुबाई गोरखनाथ झिंजुर्डे, ( चित्ते पिंपळगांव औरंगाबाद) हे दोघेजण जागीच ठार झाले. तर भक्ती बाबसाहेब झिंजूर्डे, (वय ९), माधुरी गणेश झिंजुर्डे, अमोल गोरखनाथ झिंजूर्डे, गणेश गोरखनाथ झिंजूर्डे, तजेस गणेश झिंजूर्डे वय दीड वर्ष हे पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटी, चालक जखमी

दरम्यान, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्ह्यात अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाही. आज पुन्हा बीड तालुक्यातील मंझरी फाट्यावर मुगाचे पोते घेऊन जाणारा ट्रक ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला. त्यावेळी रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली. लातूर येथून जळगाव कडे "मुगाचे पोते "घेऊन जाणारा ट्रक ब्रेक फेल झाल्यामुळे मंझरी फाट्यावर "पलटी झाला. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला.

First published: