मुंबई, 4 जून : बळीराजाचे मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लागले आहेत. मान्सून अद्याप राज्यात दाखल झाला नाही. मात्र राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. जळगाव, अहमदनगर, धुळे या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण असून, वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात पाऊस अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता तालुक्यासह अनेक ठिकाणी आज वादळी वाऱ्यानं हजेरी लावली. तर काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं नागरिकांची धांदल उडाली. पाऊस पडल्यानं शेतीच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये गारपीट दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. जळगाव सह धरणगाव, एरंडोल, पारोळा तालुक्यासह अनेक ठिकाणी गारपीट होऊन मोठं नकुसान झालं आहे. सकाळी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात कडक उन्हाचा तडाका पाहायला मिळाला, मात्र त्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. Monsoon Update : मोठी बातमी! ‘या’ तारखेला मान्सून राज्यात दाखल होणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज भींत कोसळली भुसावळ शहरात देखील आज अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. जोरदार वादळामुळे एका इमरातीच्या सहाव्या मजल्यावरील भिंत कोसळल्याची देखील घटना घडली आहे. सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील जोरदार वादळ निर्माण झालं. या वादळामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.