जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठा आवाज झाला अन् उल्का सदृष्य वस्तू छत तोडून थेट घरात आदळली, नगरमध्ये खळबळ

मोठा आवाज झाला अन् उल्का सदृष्य वस्तू छत तोडून थेट घरात आदळली, नगरमध्ये खळबळ

 ज्या ठिकाणी ही उल्का आदळली आहे त्या ठिकाणी जमिनीवर खड्डा पडून नुकसान झाले आहे

ज्या ठिकाणी ही उल्का आदळली आहे त्या ठिकाणी जमिनीवर खड्डा पडून नुकसान झाले आहे

ज्या ठिकाणी ही उल्का आदळली आहे त्या ठिकाणी जमिनीवर खड्डा पडून नुकसान झाले आहे

  • -MIN READ aahama
  • Last Updated :

कोपरगाव, 24 जानेवारी : अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोजडे गावात उल्का सदृश्य वस्तू छत फोडून जमिनीवर आदळली. मोठा आवाज झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावात किरण ठाकरे यांच्या घरात मंगळवारी सकाळी उलका सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर उल्का सदृश्य वस्तू ठाकरेंच्या घराचे छत फोडून घरात येऊन पडल्याने ठाकरे कुटुंबात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली मात्र घराचे छताचा पत्रा तुटला असून ज्या ठिकाणी ही वस्तू पडली आहे. ज्या ठिकाणी ही उल्का आदळली आहे त्या ठिकाणी जमिनीवर खड्डा पडून नुकसान झाले आहे. सुरुवातीला जोरदार आवाज झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क नागरिकांमधून लावले गेले, मात्र नेमकी ही वस्तू काय आहे हे कोणालाच कळेना. कोणी म्हणतो बॉम्ब सदृष्य वस्तू आहे तर कोणी म्हणे गॅस टाकी फुटली अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली. यावेळी हे उल्का सदृश्य वस्तू असल्याचे त्यांचे निदर्शनास आले असून या वस्तूचे नमुने तपासण्यासाठी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. खगोलशास्त्र विभागाकडे तपासणी करिता पाठवण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात