मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जबरदस्ती धर्मांतर, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती, श्रीरामपुरात पुन्हा लव्ह जिहाद?

जबरदस्ती धर्मांतर, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती, श्रीरामपुरात पुन्हा लव्ह जिहाद?

श्रीरामपूरमध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहाद?

श्रीरामपूरमध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहाद?

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पुन्हा एकदा लव्ह जिहादच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची विक्री करून धर्मांतर करण्यात आलंय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadnagar, India

हरीश दिमोटे, प्रतिनिधी

श्रीरामपूर, 20 मार्च : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पुन्हा एकदा लव्ह जिहादच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची विक्री करून धर्मांतर करण्यात आलंय. ही मुलगी आज सात महिन्यांची गर्भवती असल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना गजाआड करण्यात आलंय.

श्रीरामपूर तालुक्यातील एका 14 वर्षीय मुलीची विक्री करून तीचे धर्मांतर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर पीडित मुलीवर पठाण नावाच्या सराईत गुन्हेगाराने अत्याचार केले, यातून ती गर्भवती झाली असून आठ महिन्याचा गर्भ तिच्या पोटात वाढतोय. आठ वर्षापुर्वी मुलीच्या आईला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नवाब लालाभाई शेख नावाच्या व्यक्तीने त्याचे अगोदर लग्न झालेले असतानाही बेकायदेशीर संसार थाटला. पीडित मुलीच्या आईने आणी नवाब शेख यांनी तिचे अपहरण करून विक्री केल्याचा आणि अत्याचार केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय.

मुलगी अगदी 12-13 वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. श्रीरामपूरातील ही एकमेव घटना नाही, याअगोदरही शेकडो घटना घडल्या असून सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे., अशी मागणी शिवप्रतिष्ठानकडून करण्यात येत आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नवाब शेख आणी मुलीवर अत्याचार करणारा नजिम पठाण याला पोलीसांनी जेरबंद केले आहे. मुलीची आई देखील यात आरोपी असून पोलीस तिचाही शोध घेत आहेत.

या अगोदरही श्रीरामपूर तालुक्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. आमीष दाखवून, फुस लावून पळवून नेणे आणि अत्याचार करून वाममार्गाला लावणे, धर्मांतर करणे असे प्रकार घडले आहेत. सदर प्रकरणातील मुलीच्या आईलाही फुस लावून पळवून नेण्यात आले होते आता तिच्याच मदतीने मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली आहे.

First published:
top videos

    Tags: Love jihad