जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पवार-शिंदे लढाईत नवा ट्विस्ट, विखे-पाटील ठरणार गेम चेंजर!

पवार-शिंदे लढाईत नवा ट्विस्ट, विखे-पाटील ठरणार गेम चेंजर!

पवार-शिंदेंमध्ये सत्तास्थापनेची रस्सीखेच, विखे ठरणार गेम चेंजर

पवार-शिंदेंमध्ये सत्तास्थापनेची रस्सीखेच, विखे ठरणार गेम चेंजर

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार आणि विखे पाटील संघर्ष हा सर्वश्रूत आहे. या वादाचा पुढचा अंका येत्या काही दिवसात बघायला मिळण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ Ahmadnagar,Maharashtra
  • Last Updated :

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहमदनगर, 6 मे : महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल येत आहेत. यातल्या कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. रोहित पवार आणि राम शिंदे यांच्या गटांना प्रत्येकी 9-9 जागांवर संमिश्र कौल मिळाला आहे. आता सभापती, उपसभापती कोणत्या गटाचा होणार, याकडे लक्ष लागलं आहे. पदाधिकारी निवडीत घोडेबाजार होणार का चिठ्ठीच्या आधारे दोन्ही निवडी होणार? याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. संचालक फोडाफोडीच्या राजकारणाचे पडसाद स्थानिक पातळीवरही उमटण्याची शक्यता आहे. बाजार समिती निवडणूक राम शिंदे आणि रोहित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. या दोघांनी प्रचारात समविचारी स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन धुरळा उडवला होता. दोन्ही आमदारांनी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर बहुमताचा दावा केला होता, मात्र मतदारांनी क्रॉस मतदाना केल्यामुळे निकाल संमिश्र लागला. सत्तेचा सामना 9-9 ने बरोबरीमध्ये सुटला, त्यामुळे सभापती-उपसभापती पदाधिकारी निवडीत दोन्ही गटाच्या नेत्यांचा कस लागणार आहे. अश्रूंचा बांध फुटला, जयंत पाटलांसमोर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ढसाढसा रडला, Video संचालक फोडाफोडी करणं दोन्ही आमदार कटाक्षाने टाळतील, असा अंदाज आहे. फोडलेल्या संचालकास पदाची ऑफर मिळाल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम निष्ठावंतांवर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पुढील जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीत याचे पडसाद उमटतील, अशी स्थिती आहे. समितीच्या देऊ जिल्हा बँक खासदार सुजय विखे हेही सध्या शांत आहेत. मात्र, ते ऐनवेळी धक्का देऊ शकतात. संचालकपदाच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस मित्रपक्षास सुरुंग लावत अंबादास पिसाळ यांची एकमताने वर्णी लावली होती. यासह जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांनी चमत्कार घडविला होता. नुकतेच त्यांनी एका कार्यक्रमात कर्जत बाजार समितीवर भाजपचाच झेंडा फडकेल. सभापती आमचाच होईल, असे भाकित वर्तविले आहे, त्यामुळे राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या सत्तेच्या संघर्षात हुकमी खासदार सुजय विखे आपल्याकडे घेत चमत्कार घडवतात? का चाणाक्ष रोहित पवार खासदार सुजय विखे- राम शिंदे या दोघांना शह देण्यात यशस्वी ठरतात? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात