अहमदनगर, 9 फेब्रुवारी: कोपरगाव तालुक्यात (Kopargaon Taluka) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेततळ्यात पडलेल्या पत्नीला वाचवताना पतीचाही बुडून मृत्यू (Husband wife died due to drowning) झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar) घडली आहे. या अपघातात नवविवाहित जोडप्याचा संसार सुरू होण्याच्या आतच मोडल्याने शोककळा पसरली आहे. मंगळवारी 8 फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. कशी घडली ही घटना? अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली आहे. आचलगाव येथील पूजा निलेश शिंदे ही पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेली होती. पाणी काढत असताना पूजा शेततळ्यात पडली. पत्नी शेततळ्यात पडल्याने तिला वाचवणसाठी पती निलेश यानेही पाण्यात उडी घेतली. पूजा हिला वाचवण्यासाठी पतीने पाण्यात उडी घेतली मात्र पाणी खोल असल्याने दोघांनाही बाहेर पडता आले नाही. घटनेची माहिती मिळताच नातलग आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शोधाशोध करून दोघांनाही पाण्याच्या बाहेर काढले. तातडीने त्यांना कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी दोघांचाही मृत्यू झाल्याचं सांगितलं. वाचा : सकाळी जन्मलेल्या बाळाची दुपारी चोरी; आईच्या डोळ्यादेखत पळवलं काळजाच्या तुकड्याला गेल्यावर्षीच झाला होता विवाह पूजा हिचा पाय घसरल्याने ती शेततळ्यात पडली. तिने आरदा ओरड केल्या नंतर जवळच असलेला तिचा पती निलेश हा याने पत्नीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, दुर्दैवाने दोघांचाही यात मृत्यू झाला. गेल्या वर्षीच निलेश आणि पूजाचा विवाह झाला होता. या अपघातामुळे त्यांचा संसार सुरू होण्याच्या आतच मोडल्याने परीसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे आणि पोलीस कर्मचारी घटना्थळी पोहचले. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना शेततळ्याबाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. निलेश हा उच्च शिक्षित होता आणि वर्षभरापूर्वीच त्याचा पूजा हिच्याशी विवाह झाला होता. वाचा : भावाला आईच्या रुममध्ये झोपायला पाठवलं अन्..; सकाळी भयावह अवस्थेत आढळली तरुणी आधी आईची हत्या केली मग स्वत: घेतला गळफास, सांगलीत खळबळ वृद्ध आईचा खून करत स्वतः गळफास घेऊन एका मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगली च्या आष्टा याठिकाणी हा प्रकार घडला आहे. ही घटना समोर आल्यानंतर आष्टा शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी धाव घेत पंचनामा करत घटनेची नोंद केली आहे. घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली असून त्यातून धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्येपूर्वी शशिकांत यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेली एक चिठ्ठी लिहून ठेवली असून यात माझ्या आजारपणाला कंटाळून आपण आत्महत्या करत आहे आणि आईला सांभाळण्यास कोणी नसल्याने, मी आईला माझ्यासोबत घेऊन जात आहे असे लिहिले आहे. ही घटना समोर आल्यानंतर आष्टा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.