मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

कोल्हापूर: भावाला आईच्या रुममध्ये झोपायला पाठवलं अन्..; सकाळी भयावह अवस्थेत आढळली तरुणी

कोल्हापूर: भावाला आईच्या रुममध्ये झोपायला पाठवलं अन्..; सकाळी भयावह अवस्थेत आढळली तरुणी

 प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Kolhapur: कोल्हापूर शहराच्या फुलेवाडी रिंगरोड परिसरातील माऊली नगरात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एक महाविद्यालयीन तरुणीने भयावह पद्धतीने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

    कोल्हापूर, 09 फेब्रुवारी: कोल्हापूर (Kolhapur) शहराच्या फुलेवाडी रिंगरोड परिसरातील माऊली नगरात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एक महाविद्यालयीन तरुणीने आपल्या राहत्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Female college student commits suicide) केली आहे. मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत तिने बेडरुमचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे कुटुंबानं बेडरुमचा दरवाजा तोडला. यावेळी रुममधील चित्र पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. संबंधित तरुणी बेडरुममध्ये पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली आहे. या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. प्रिया केरबा जाधव असं आत्महत्या करणाऱ्या 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचं नाव आहे. हेही वाचा-भररस्त्यात पत्नीवर चाकूनं सपासप वार; डोंबिवलीतील थरकाप उडवणारी घटना, कारण समोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रिया ही महाविद्यालयात शिक्षण घेते. तर तिचे वडील कन्स्ट्रक्शन व्यावसायिक आहेत. तिला आई-वडील, लहान भाऊ आणि मोठी बहीण असा परिवार आहे. तिचा लहान भाऊ दररोज तिच्याच बेडरूममध्ये झोपायचा. पण घटनेच्या दिवशी मृत प्रियाने आपल्या धाकट्या भावाला आईच्या रुममध्ये झोपायला पाठवलं होतं. तरीही आपल्या बहिणीचा नेमका इरादा काय आहे? हे भावाच्या लक्षात आलं नाही. त्यानंतर मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत प्रियाने आपल्या रुमचा दरवाजा उघडला नाही. हेही वाचा-मुंबईत HIVग्रस्त बापाकडून सावत्र मुलीसोबत विकृतीचा कळस; दररोज करायचा भयंकर कृत्य बराच वेळ प्रिया दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबीय गोंधळून गेले होते. त्यांनतर त्यांनी बेडरुमचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रिया गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेची माहिती जुना राजवाडा  पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur, Suicide

    पुढील बातम्या