मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /छत्रपती संभाजीनगर नामांतरास काँग्रेसचा छुपा विरोध होता; शिवसेना प्रवक्त्याचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर नामांतरास काँग्रेसचा छुपा विरोध होता; शिवसेना प्रवक्त्याचा गंभीर आरोप

शिवसेना प्रवक्त्याचा गंभीर आरोप

शिवसेना प्रवक्त्याचा गंभीर आरोप

शिवसेना प्रवक्ते प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अहमदनगर, 2 एप्रिल : काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे नामांतर करण्यास मंजुरी दिली. मात्र, यावरुन आता शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्याने काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केला आहे. छत्रपती संभाजीनगर अशा नामकरणाबाबत काँग्रेसने नेहमीच दुटप्पी भूमिका घेतलेली होती. नामांतराला काँग्रेसचा छुपा विरोध होता, असा थेट आरोप शिवसेना प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले संजीव भोर पाटील?

वरून एक भूमिका व आतून छुपा विरोध असंच याबाबत काँग्रेसचे धोरण राहिलेलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची जी सभा होत आहे, या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसच्या नेत्यांनी नामांतराबाबत जनतेच्या मनातील संभ्रम दूर केला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर असं औरंगाबादचं नामकरण करण्यास काँग्रेसचे समर्थन असेल तर तसं आजच्या सभेत नाना पटोले यांनी या निर्णयाचे जाहीर समर्थन करण्याची धमक दाखवावी, असं आव्हानच संजीव भोर पाटील यांनी काँग्रेसला दिलं आहे.

अहमदनगरचे ना बदलणार?

भारतीय जनता पक्षाने अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण करण्याची मागणी सुरू केली आहे. अहमदनगरचे नाव अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर करण्याची मागणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

वाचा - 'मविआ'च्या सभेपूर्वी ठाकरे गट, शिंदे गटाचे दोन बडे नेते एकत्र; शिरसाटांचं 'ते' वक्तव्य खरं होणार?

भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात झाला. म्हणूनच अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर असे नामकरण व्हावे अशी आमची इच्छा आहे, असे सांगून ते म्हणाले, "औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे आधीच बदलण्यात आल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत." सध्या गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी दुसऱ्यांदा मांडली आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र सरकारला याबाबत पत्र लिहिले होते.

सरकार विचार करेल..

दरम्यान, महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी याबाबत सरकार लक्ष घालणार असल्याचे सांगितले. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्याच वेळी, उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले होते की, नाव बदल केवळ नागरी हद्दींना लागू आहे, संपूर्ण जिल्ह्यांना नाही.

First published:
top videos

    Tags: Chhatrapati Sambhaji Nagar