Home /News /maharashtra /

'साहेब गद्दारांना क्षमा नाही', अहमदनगरमध्ये काँग्रेसची बॅनरबाजी

'साहेब गद्दारांना क्षमा नाही', अहमदनगरमध्ये काँग्रेसची बॅनरबाजी

अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाचे बॅनर लावले आहेत.

सुनिल दवंगे, प्रतिनिधी अहमदनगर, 26 जून : शिवसेनेच्या (Shiv Sena) 40 आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्य सरकार संकटात सापडलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात आमदारांनी बंड पुकारलं आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांकडून आपआपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली जात असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाचे बॅनर लावले आहेत. "साहेब गद्दारांना क्षमा नाही, आय सपोर्ट उद्धव ठाकरे" श्रीरामपूर शहरात काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा विद्यमान शहराध्यक्ष संजय छल्लारे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ श्रीरामपूर नगरपरिषद  कार्यालयाजवळ हे बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर ‘साहेब गद्दारांना क्षमा नाही, आय सपोर्ट उद्धव ठाकरे’ असा मजकूर लिहिलेला आहे. भगव्या रंगाच्या या बॅनरवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत जयंत ससाणे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शहराध्यक्ष संजय संजय छल्लारे यांचा गळ्यात भगवे उपरणे घातलेला फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे. (पुढच्या 12 तासांमध्ये ठरणार महाविकास आघाडीचं भवितव्य, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीत घडामोडींना वेग) सोशल मीडियावर भाजप कार्यकर्ते बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत. तर आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. छल्लारे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आता घरोबा नको तर नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत सत्ता स्थापन करावी, अशी अट घालत एकनाथ शिंदे यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे. कडवट शिवसैनिक अशी ओळख असणारे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदें यांच्यासह सेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंड पुकारत आधी सुरत आणि नंतर थेट गुवाहाटी गाठली आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे राज्य सरकार अस्थिर झाले आहे. ठाकरे सरकारचे काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच या बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून ठिकठिकाणी निदर्शने तसेच आक्रमक आंदोलनं केली जात आहेत. मात्र आता शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्ते देखील उद्धव ठाकरे यांना पाठींबा देण्यासाठी सरसावल्याचं बघायला मिळतंय. यावेळी बोलतांना काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छ्ल्लारे यांनी म्हणटलं की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महारांजाचा वारसा लाभला आहे. शिवसेना सारख्या पक्षामध्ये असे गद्दार लोकं जन्माला येणे हे दुर्देव आहे. शिवसेनेच्या जीवावर मोठे होवून अडीच वर्षे फायदे घेतले. अडीच वर्षापूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत युती करण्यास नकार द्यायला हवा होता. आता कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली बंड पुकारलं. याचं श्रीरामपुर काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करत आहोत.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Ahmednagar News, Shiv sena, Shiv sena. शिवसेना, काँग्रेस, शिवसेना

पुढील बातम्या