मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी, बाळासाहेब थोरातांच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी, बाळासाहेब थोरातांच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

बाळासाहेब थोरात आणि सुरेश थोरात

बाळासाहेब थोरात आणि सुरेश थोरात

राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू आणि काँग्रेस नेते सुरेश थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगर, 19 ऑगस्ट : अहमदनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू आणि काँग्रेस नेते सुरेश थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी थोरात यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल. थोरात यांच्याविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश थोरात हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. जोर्वे गावातील डॉ. चत्तर यांच्या फिर्यादीवरून सुरेश थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (झोपेअभावी MTNL चे माजी अधिकारी त्रस्त; कुटुंबीय घरात असताना 16 व्या मजल्यावरुन मारली उडी) दुसरीकडे डॉ. चत्तर यांच्या स्वानंद चत्तर या भावाने काल दुपारी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यावरून सुरेश थोरात आणि इतर ग्रामस्थांनी संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर रात्री उशिरा सुरेश थोरात यांसह इतर 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चत्तर यांनी थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करताना मात्र सोशल मीडियात केलेल्या पोस्टचा उल्लेख टाळला आहे.
First published:

पुढील बातम्या