जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बहिणीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशय, भावाने रागाच्या भरात विषयच संपवला! शिर्डीतील हादरवणारी घटना

बहिणीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशय, भावाने रागाच्या भरात विषयच संपवला! शिर्डीतील हादरवणारी घटना

शिर्डी हत्याकांड

शिर्डी हत्याकांड

शिर्डीतून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
  • Last Updated :

शिर्डी, 3 मे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बलात्कार, हत्या, आत्महत्येच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता शिर्डीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या भावाने राहत्या फ्लॅटच्या बेडरुममध्ये मोठ्या पेव्हर ब्लॉकने ठेचून आपल्या बहिणीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

काय आहे संपूर्ण प्रकरण - शिर्डीत भावाने बहिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना काल घडली आहे. 19 वर्षीय भावाने आपल्या 17 वर्षीय बहिणीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वरी कुलथे असे मृत मुलीचे नाव आहे. तर श्रृत कुलथे कुलथे असे आरोपी भावाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला गजाआड केले असून अधिक तपास केला जात आहे. शिर्डीतील मयुरेश्वर कॉलनीमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय युवतीची सख्या भावानेच डोक्यात सिमेंटचा पेवर ब्लॉक घालून हत्या केली. बहिणीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून भावाने तिची हत्या केली, अशी प्राथमिक माहिती आहे. ज्ञानेश्वरी कुलथे असे मृत मुलीचे नाव आहे. मृत मुलीचे आजोबा प्रविन काशिनाथ विसपुते, वय 65 वर्ष, रा कालीकानगर शिर्डी ता.राहाता यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. दिनांक 2 मे रोजी सायकाळी साडेचार ते सहा वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीने त्यांच्या नातीच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक घालून डोक्याचा आणि चेहऱ्याचा चेंदामेंदा करून तिचा खून केला. पोलीस तपासात आरोपी हा मुलीचा भाऊच निघाला. याप्रकरणी आरोपी श्रृत कुलथे यास पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथून अटक केली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात