मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आधी मोठमोठी भाषणं दिली अन् आता..'; अण्णा हजारेंचं केजरीवालांना पत्र, त्या निर्णयाबाबत व्यक्त केली नाराजी

'आधी मोठमोठी भाषणं दिली अन् आता..'; अण्णा हजारेंचं केजरीवालांना पत्र, त्या निर्णयाबाबत व्यक्त केली नाराजी

या पत्रात अण्णा हजारे (Anna Hazare Letter) यांनी दारू धोरणावर केजरीवाल यांना फटकारले आहे. अण्णा हजारे म्हणाले की, तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे दारू धोरण केलं, लोकांचं जीवन उद्ध्वस्त केलं

अहमदनगर 30 ऑगस्ट : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिलं आहे. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यापासून अण्णांनी हे पहिलं पत्र लिहिलं आहे. दिल्लीतील दारू धोरणात घोटाळे झाल्याच्या वृत्ताबाबत अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिलं आहे. अण्णांनी यात आपली नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात अण्णा हजारे यांनी दारू धोरणावर केजरीवाल यांना फटकारले आहे. अण्णा हजारे म्हणाले की, तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे दारू धोरण केलं, लोकांचं जीवन उद्ध्वस्त केलं. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. अण्णांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, टीम अण्णाच्या सदस्यांची 10 वर्षांपूर्वी 18 सप्टेंबर 2012 रोजी दिल्लीत बैठक झाली, त्यावेळी तुम्ही राजकीय मार्ग स्वीकारण्याबाबत बोलले होते. पण राजकीय पक्ष काढणे हे आमच्या आंदोलनाचं उद्दिष्ट नव्हतं हे तुम्ही विसरलात. 'आता आम्हाला कमी बॉलवर जास्त रन्स काढायचे', असं का म्हणाले मुख्यमंत्री शिंदे? चर्चांना उधाण त्यावेळी जनतेच्या मनात टीम अण्णांबद्दल एक विश्वास निर्माण झाला होता. म्हणूनच टीम अण्णाने देशभर फिरून लोकशिक्षण, जनजागृतीचं काम करणं गरजेचं आहे, असं मला त्यावेळी वाटलं. या दिशेनं काम झालं असतं, तर दारूबाबत असं चुकीचं धोरण कुठेही केलं नसतं. अण्णा हजारे म्हणाले, सरकार कोणत्याही पक्षाचे असो, सरकारला जनहिताचे काम करण्यास भाग पाडण्यासाठी समविचारी लोकांचा दबावगट असणं गरजेचं होतं. तसं झालं असतं तर देशात परिस्थिती वेगळी असती आणि गरिबांना फायदा झाला असता. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. त्यानंतर तुम्ही, मनीष सुसोदिया आणि अन्य सहकाऱ्यांनी मिळून पक्ष स्थापन केला. ऐतिहासिक चळवळ उद्ध्वस्त करून स्थापन झालेला पक्षही इतर पक्षांच्या वाटेवर जाऊ लागला. हे अत्यंत दुःखद आहे. metro 3 trial run : 'आता राजकीय प्रदुषण बंद झालं' मुख्यमंत्री शिंदेंचा शिवसेनेला टोमणा अण्णा म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी ऐतिहासिक आणि लोकनियुक्त आंदोलन झालं. त्यात लाखो लोक आले. त्यावेळी तुम्ही लोकायुक्तांची गरज असल्याबद्दल मंचावरून मोठमोठी भाषणे दिलीत. आदर्श राजकारण आणि व्यवस्थेचे विचार मांडले. पण दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकपाल आणि लोकायुक्त कायदा विसरलात. तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे, लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे दारू धोरण केले. यावरून तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात तफावत असल्याचे दिसून येते.
First published:

Tags: Anna hazare, Arvind kejriwal

पुढील बातम्या