अहमदनगर, 13 जुलै: तुमच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि कठीण परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश तुम्ही सहज मिळवू शकता. अहमदनगरमधील मनोहरपूरच्या शेतकरी पुत्राने मोठं यश संपादन केलंय. कठीण परिश्रम करून देशातील सर्वात कठीण मानली जाणारी सीए म्हणजेच चार्टड अकाऊंटची परीक्षा प्रतीक भांगरे यानं पास केली आहे. मृत आजोबांचे इच्छा पूर्ण केल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून प्रतीकचं कौतुक होत आहे. प्रतीक शेतकरी कुटुंबातील मुलगा प्रतीक भंगारे हा नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवासी आहे. प्रतिकची घरची परिस्थिती सामान्य आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तो मोठा झाला. प्रतीकचे वडिल पारंपारिक शेती करतात, तर आई गृहिणी आहे. प्रतिक गेल्या काही वर्षापासून सीएच्या परीक्षेची तयारी करत होता. या परीक्षेत कठीण परिश्रम केल्यानंतर आता त्याला यश आले आहे.
सीए परीक्षेत मोठं यश सीए ही देशातली सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत यश मिळवून त्याने कुटूंबियांचे नाव मोठे केले आहे. “हे यश संपादन करत असताना मी सोशल मीडियावर देखील सक्रिय होतो आणि इतरही मनोरंजनाच्या गोष्टी करत होतो. मात्र आपण या सर्व गोष्टींचा कितपत योग्य वापर करून घेतो हे महत्त्वाचे आहे,” असे या यशाबाबत बोलताना प्रतीक सांगतो. PSI Success Story : शेतकरी बापानं मोलमजुरी करून शिकवलं, लेकीनं जिद्दीनं PSI होऊन दाखवलं! आजोबांची इच्छा केली पूर्ण आजोबांनी हयात असताना प्रतिकला सीए बनविण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाची प्रतिकने जान ठेवली. प्रतिकने आजोबांच्या इच्छेखातर सीए परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सीएच्या अंतिम पेपरच्या काहीच दिवस आधी प्रतीकच्या आजोबांचे निधन झाले होते. मात्र प्रतिकने खचून न जाता आपल्या आजोबांची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला व आज आजोबांच्या पश्चात हे यश संपादन केलं आहे.