हरीष दिमोटे, (श्रीरामपूर/अहमदनगर), 15 डिसेंबर : श्रीरामपूर शहरातील जिमचालकाने मुलीसोबत लग्नाचा बनाव करून 3 वर्ष अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून जिमचालक युवराज विजय शिंदे याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे अहमदनगरमधीय श्रीरामपूर येथे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
तुझ्या घरच्यांची बदनामी करून भावाला जीवे मारून टाकण्याची धमकी देत सातत्याने होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून पिडीत तरूणीने प्रवरा नदीपात्रात स्वतःला झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरीकांनी या तरूणीला वाचवले आणि रूग्णालयात दाखल केले त्यानंतर हि घटना उघडकीस आली आहे.
हे ही वाचा : लेकीला शेतात जाळलं अन्.., जालन्यातील बाप आणि चुलत्याचे कृत्य असे आले समोर
मुलीच्या फिर्यादीवरून जिमचालक युवराज शिंदे याच्या विरोधात भादवी कलम 376, 376 (2), एन, 420, 323, 504,506 अन्वये गुन्हा दखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे. या घटनेमुळे जिमला जाणाऱ्या तरूणी आणी महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली असून पोलीसांनी आणखी कुणी अशा प्रकारे बळी पडलंय का? याचा तपास करावा आणि आरोपीला लवकर अटक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या फातीमा शेख यांनी केली आहे.
जालन्यात धक्कादायक घटनेने हळहळ
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहेत. त्यातच आता जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलगी पळून गेल्यानंतर समाजात बदनामी झाल्याने झाडाला गळफास देऊन बाप आणि चुलत्याने मुलीचा खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : धक्कादायक! प्रश्नाचं उत्तर न आल्यानं शिक्षकानं फोडलं विद्यार्थ्याचं डोकं; निर्दयी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल
मनाला हेलावणारी ही घटना जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव येथे बुधवारी उघडकीस आली आहे. सुर्यकला उर्फ सुरेखा संतोष सरोदे असे मृत मुलीचे नाव आहे. तर संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे असे संशयित आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन, उपनिरीक्षक शिवाजी पोहार, गणेश झलवार आदींनी हा गुन्हा उघड केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.