मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नगर जिल्हा बँकेत अजित पवारांना विखे पितापुत्रांचा धक्का; बहुमत असूनही शिवाजी कर्डिले अध्यक्षपदी

नगर जिल्हा बँकेत अजित पवारांना विखे पितापुत्रांचा धक्का; बहुमत असूनही शिवाजी कर्डिले अध्यक्षपदी

अजित पवार यांना विखेंचा पुन्हा दणका

अजित पवार यांना विखेंचा पुन्हा दणका

महाविकास आघाडीचे बहुमत असतानाही भाजपाच्या शिवाजीराव कडले यांची अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी वर्णी.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

साहेबराव कोकणे, अहमदनगर

अहमदनगर, 8 मार्च : राज्यात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले आहेत. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद झाले. जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे-पिता पुत्राची खेळी यशस्वी झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नगरच्या राजकारणामध्ये पुन्हा दणका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन उदय शेळके यांच्या निधनानंतर बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. मंगळवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना अध्यक्षपद देण्याचे ठरवले गेले. महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याने घुले यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, ऐन वेळेस राज्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांच्या खेळीमुळे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कडले यांचा विजय झाला.

वाचा - कोल्हापुरात राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धैर्यशील मानेंची गाडी अडवली

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना नऊ मध्ये तर भाजपाचे उमेदवार शिवाजीराव कडले यांना दहा मते मिळाली आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आजही विखे पॅटर्न चालतो यावर शिक्का मुहूर्त झाले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे मंगळवारी नगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नवीन अध्यक्ष निवडीबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडाळाशी चर्चाही केली होती. त्यानंतर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी या अध्यक्षपदासाठी अर्जही भरला. यावेळी सर्वांना वाटलं की ही निवडणूक बिनविरोध होईल. मात्र, शेवटच्या क्षणी शिवाजी कर्डिले यांनी अर्ज भरला आणि ते विजयी झाले. राधाकृष्ण विखे पाटलांनी चमत्कार घडवत शेवटच्या क्षणी बाजी पलटवली. त्यामुळे अजित पवारांसह बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, Radha krishna vikhe patil