हरीश दिमोटे, प्रतिनिधी अहमदनगर, 30 मे : अहमदनगर जिल्ह्यातील कुटुंबाला (वैदू) जातपंचायतने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जातपंचायतीने वाळीत टाकल्यामुळे या कुटुंबाला आज होणाऱ्या भाच्याच्या लग्नाला मामाला जाता आले नाही. जातपंचायतच्या दहशतीमुळे बहिणीने भावाला दुखःद अंतकरणाने चिठ्ठी लिहून लग्नाला येवू नये, असं आवाहन केलं, त्यामुळे जातपंचायतीचा जाच पुन्हा एकदा समोर आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे ( वैदू समाजातील ) सुशिक्षित डॉ. चंदन लोखंडे गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील अनिष्ठ परंपरा विरोधात लढा देत आहेत, त्यामुळेच की काय जातपंचायतच्या पंचानी त्यांच्या कुटुंबावरच अघोषित बहिष्कार टाकलाय. गेल्या पाच सहा महिन्या पासून लोखंडे यांच्या कुटुंबियांना कोणीही सुख दुखःच्या वेळी बोलावत नाही. त्यांच्याकडेही कोणी जात येतही नाही. चंदन लोखंडे यांच्या भाच्याचा आज विवाह पार पडला मात्र बहिणीने अगोदरच पत्र लिहून भावाला लग्नाला न येण्याचं आवाहन केलं, कारण जर लग्नाला हे लोक गेले तर लग्न मोडेल आणि 12 लाख रूपये दंडही द्यावा लागेल, असं मुलीने सांगितलं. पठ्ठ्या परिक्षेला आला, कॉपीचा पॅटर्न पाहून सगळेच चक्रावले, नाशिक पोलिसांकडून अटक जात पंचायतीने अघोषित बहिष्कार टाकल्याने कुटुंबातील मुलांची लग्न जमवणे कठीण झालंय. डॉ. चंदन लोखंडे सामाजातील अनिष्ठ प्रथा परंपरा विरोधात लढा देत असल्याने आमच्यावर अघोषित बहिष्कार टाकण्यात आला असून आम्ही प्रचंड दहशतीखाली जगत असल्याचे लोखंडे कुटुंबीय सांगत आहेत. पाच सात वर्षांपूर्वी जात पंचायती बंद झालेल्या असतानाही अघोषितपणे त्या आजही अस्तित्वात असल्याचे लोखंडे यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलंय. वैदू समाजचे माजी प्रदेशाध्यक्ष कृष्णा शिंदे यांनी देखील या घटनेचा निषेध केला असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. Jalna News : माणूस मेल्यानंतर दिला जात नाही मुखाग्नी, गिधाडं खातात पार्थिव, असं का करतात?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.