मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Ahhmednagar Tahsildar Crime News : रुग्णालयात तहसीलदाराची हिरोगिरी, नर्सने शिकवला कायमचा धडा, अहमदनगरमधील घटना

Ahhmednagar Tahsildar Crime News : रुग्णालयात तहसीलदाराची हिरोगिरी, नर्सने शिकवला कायमचा धडा, अहमदनगरमधील घटना

तहसिलदारांनी रुग्णालयातील काही परिचारिका आणि महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करत विनयभंग केल्याची तक्रार देण्यात आली आहे.

तहसिलदारांनी रुग्णालयातील काही परिचारिका आणि महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करत विनयभंग केल्याची तक्रार देण्यात आली आहे.

तहसिलदारांनी रुग्णालयातील काही परिचारिका आणि महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करत विनयभंग केल्याची तक्रार देण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadnagar, India

अहमदनगर, 26 फेब्रुवारी : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तहसीलदार कोपरगावात काही कामानिमीत्त काल (दि.25) आले होते. यावेळी तेथील ग्रामीण रुग्णालयात त्यांनी भेट दिली. यावेळी तहसिलदारांनी रुग्णालयातील काही परिचारिका आणि महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करत विनयभंग केल्याची तक्रार देण्यात आली आहे. याबाबत तहसिलदारांवर कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान तहसीलदारांनी ग्रामीण रुग्णालयात काल (दि.26) शनिवारी पहाटे साडेपाच वाजता पोहोचले होते. यावेळी रुग्णालयातील परिचारिका व तेथील कर्मचाऱ्यांशी त्यांनी असभ्य वर्तन केल्याची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान उपस्थित परिचारिकेचा तहसिलदारांनी विनयभंग केल्याची तक्रार कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; आरोपींकडून सपासप वार, थरारक video सीसीटीव्हीमध्ये कैद

तहसीलदार ग्रामीण रुग्णालयात डाॅक्टर आणि इतर लोक कामावर हजर असतात कि नाही याची झाडाझडती घेत होते. त्यामुळे आपल्यावर कारवाई झाली तर काय होईल या भिती पोटी तहलिसदारांवर मुद्दाम गुन्हा दाखल झालाय का ? असाही प्रश्न निर्माण केला जात आहे. यावर जोरदार चर्चा रंगली आहे.

काल शनिवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान तहसीलदार विजय बोरूडे आपल्या ड्रायव्हरसह ग्रामीण रुग्णालयात पोहचले. ते रुग्णालयात पोहोचताच तेथील सर्व घटना आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केली आहे. यामधेय तहसीलदार एका वॉर्डबॉयसह आत जाताहेत आणि ड्युटीवर कोणकोण आहेत याची विचारपूस करत आहेत.

ड्युटीवर हजर असणाऱ्या यानंतर त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या नर्सकडे हजेरीपत्रक मागितल्याचे त्या व्हिडीओत दिसत आहे. याचबरोबर सध्या या रुग्णालयात कोण डाॅक्टर हजर आहेत याची विचारपूस ते करत असल्याचे दिसत आहे. डाॅक्टर हजर नसल्याने त्यांनी डाॅक्टरला फोन लावायला सांगितला. 

पाणी देण्यासाठी रात्री शेतात गेला पण घरी परतलाच नाही, शेतकऱ्यासोबत घडलं भयानक कांड; लातूर हादरलं!

यावेळी ते डाॅक्टरांना बजावत असल्याचे देखील दिसत आहे. तुम्ही पगार कसला घेत आहात. ही सर्व घटना मोबाईल कॅमेर्‍यात कैद झालेली आहे मात्र सदर परीचारीकेने आपला तहसीलदार विजय बोरूडे यांनी विनयभंग केल्याची तक्रार कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९०/२३ , भादंवी कलम ३५४,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे.

First published:
top videos

    Tags: Ahmednagar, Ahmednagar News