जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Crime News : Crime News : धक्कादायक! पाईपलाईन फोडली म्हणून तरुणाच्या डोळ्यात फेकलं अ‍ॅसिड, अहमदनगर हादरलं!

Crime News : Crime News : धक्कादायक! पाईपलाईन फोडली म्हणून तरुणाच्या डोळ्यात फेकलं अ‍ॅसिड, अहमदनगर हादरलं!

तरुणावर हल्ला

तरुणावर हल्ला

अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. शुल्लक कारणावरून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

  • -MIN READ Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
  • Last Updated :

अहमदनगर, 5 जून, साहेबराव कोकणे : अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. शुल्लक कारणावरून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सख्ख्या चुलत भावानेच हा हल्ला केला आहे. शेतातील पाईपलाईन फोडली याचा राग आल्यानं अ‍ॅसिड, तलवार आणि कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये  तरुणाच्या डोळ्यात  अ‍ॅसिड ओतण्यात आलं आहे, तर महिलांचे तलवारीनं डोके फोडण्यात आले आहेत. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतातील पाईपलाईन फोडली म्हणून रागाच्या भरात सख्ख्या चूलत भावानेच हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणाच्या डोळ्यात अ‍ॅसिड ओतण्यात आले आहे, तर महिलांचे तलवारीनं डोकं फोडण्यात आलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Vasai Crime : वसईत मजुराने ठेकेदाराच्या भावाच्या डोक्यात घातली फळी; धक्कादायक कारण समोर

घटनेनं खळबळ  दरम्यान या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अ‍ॅसिडच्या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. तर महिलांना देखील मारहाण करण्यात आली आहे. तलवारीनं डोकं फोडण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात