विवस्त्र करून मारहाणीचा VIDEO केल्याच्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी केला धक्कादायक दावा

विवस्त्र करून मारहाणीचा VIDEO केल्याच्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी केला धक्कादायक दावा

'नातेवाईकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पती-पत्नीने स्वत:ला विविस्त्र करून मारहाण केला जात असल्याचा व्हिडिओ तयार केला,' असा धक्कादायक दावा पोलिसांनी केला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 5 मार्च : अहमदनगरमधील बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पती-पत्नीला विविस्त्र करून केलेल्या मारहाणीच्या घटनेला आता नवं वळण मिळालं आहे. 'जुन्या गुन्ह्यातील आरोपींकडून पैसे उकळण्यासाठी आणि जमिनीच्या वादातून नातेवाईकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पती-पत्नीने स्वत:ला विविस्त्र करून मारहाण केला जात असल्याचा व्हिडिओ तयार केला,' असा धक्कादायक दावा पोलिसांनी केला आहे.

'इतर तीन ओळखीच्या इसमाकडून संगनमतीने हा व्हिडिओ तयार केल्याची माहिती सदर महिलेच्या पतीने दिली. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले असता या महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला,' असा दावाही पोलिसांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सुरू आहे. पीडित पत्नी, नारायण मतकर, गणेश सोपान झिरपे, अक्षय राजेंद्र कुटे, किरण श्रीधर कुटे असे पाच आरोपी या कथित बनावट व्हिडीओ प्रकरणात आहेत.

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिला आणि तिच्या पतीला पळवून नेऊन विवस्त्र करून मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी पीडित महिलेचा सख्खा भाऊ, दीर, चुलत सासरे व इतर अशा 10 जणांविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हेही वाचा- लग्नात डान्स करत होती 13 वर्षांची मुलगी, चॉकलेटचं आमिष दाखवत नराधमाने केला बलात्कार

गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाचा तपास केला असता त्यात त्यांना काळंबेरं आढळलं, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलिसांनी पीडितेच्या पतीच्या मित्राला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर वेगळाच प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांची चौकशी केल्यानंतर हे कुंभाड रचल्याचं उघड झालं, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर पीडितेच्या पतीला पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेऊन चौकशी केली. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2020 09:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading