Home /News /crime /

लग्नात डान्स करत होती 13 वर्षांची मुलगी, चॉकलेटचं आमिष दाखवत नराधमाने केला बलात्कार

लग्नात डान्स करत होती 13 वर्षांची मुलगी, चॉकलेटचं आमिष दाखवत नराधमाने केला बलात्कार

लग्नात डीजेवर डान्स करत असताना नराधमाने 13 वर्षांच्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवत बोलावून नेलं आणि बलात्कार केला.

    लखनऊ, 02 मार्च : उत्तर प्रदेशातील हमीरपूर इथं एका नराधमाने पोलिस ठाण्याशेजारीच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिस ठाण्याच्या शेजारी लग्न समारंभात डीजे सुरू होता. त्यावर डान्स करणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. सातवीत शिकणाऱ्या मुलीला नराधमाने तिथल्याच एका हॉलच्या मागे नेऊन अत्याचार केला.याबाबत पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बलात्कारानंतर मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तो पळून गेला. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. हमीरपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्लोक कुमार यांनी सांगितलं की,'सुमेरपूर ठाण्याच्या जवळ एका हॉलमध्ये लग्न सुरू होतं. तिथं अल्पवयीन मुलगी डीजेवर डान्स करत होती. त्यावेळी भागातील एका व्यक्तीने तिला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. हे वाचा : विकृतीची हद्द! 90 वर्षांच्या महिलेवर केला बलात्कार आणि खून बलात्कारानंतर पीडित मुलीला ठार मारण्याची धमकी नराधमाने दिली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. पीडित मुलीने लग्नाच्या हॉलमध्ये जाऊन आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आई पीडितेला घेऊन सुमेरपूर पोलिस ठाण्यात पोहोचली. अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हे वाचा : ATM मध्ये पैसे काढण्यासाठी मुलगा जाताच हल्लेखोराने साधला डाव, आईसोबत कलं असं
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Crime

    पुढील बातम्या