जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अब्दुल सत्तार पोहोचले अशोक चव्हाणांच्या घरी, भेटीबद्दल म्हणाले, सगळं ओक्के'!

अब्दुल सत्तार पोहोचले अशोक चव्हाणांच्या घरी, भेटीबद्दल म्हणाले, सगळं ओक्के'!


नांदेड दौऱ्यावर असलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली

नांदेड दौऱ्यावर असलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली

नांदेड दौऱ्यावर असलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली

  • -MIN READ
  • Last Updated :

नांदेड, 21 ऑगस्ट : शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचले आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. या सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या घरी जाऊन भेट घेतली, या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नांदेड दौऱ्यावर असलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. अब्दुल सत्तार यांनी नांदेडमध्ये कृषी विभागाची बैठक घेतली. बैठकीनंतर सत्तार थेट अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी पोहोचले. सत्तार आणि चव्हाण यांच्यात अर्धा तास बंद दारात चर्चा झाली. बाहेर येताना दोघांनीही सगळे ओक्के ओक्के असल्याची प्रतिक्रिया दिली.

जाहिरात

‘माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये अशोक चव्हाण, स्वर्गिय श्रीकांत चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी काम केलं आहे. आजही त्यांचं मराठवाडा, महाराष्ट्र, शेतकऱ्यांबाबतीत जाण आहे. त्यांचा अभ्यास चांगला आहे अशोक चव्हाण माझे गुरू आहेत. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो’ अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली. तसंच, ‘आमच्यामध्ये जर काही कटूता असती तर अशोक चव्हाण यांना भेटण्यासाठी आलोच नसतो, असंही सत्तार म्हणाले. ( रिफायनरी चांगली कशी? गावकऱ्यांनी निलेश राणेंना धरले धारेवर, ताफा अडवला ) अब्दुल सत्तार हे कुठेही असले तरी आमचे मैत्रीचे संबंध पहिल्यापासून आहे. शंकरराव चव्हाण असताना त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजकीय पक्ष वेगळे असले तरी आमची मैत्री खूप जुनी आहे. कुठल्याही पक्षात असले तरी मैत्रीचे संबंध हे कायम असतात. आज माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहे. त्यांना शेतकऱ्यांची जाणीव आहे, ते निश्चित चांगले काम करतील. पहिल्यापासून माझी भूमिका आहे की, राजकारणात मतभेद असावेत पण वैयक्तिक मतभेद नसावेत अशी अपेक्षा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. दरम्यान, दोघांमध्ये अर्धा तास काय चर्चा झाली याबाबत राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात