जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुन्हा एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याने स्वत:वरच चालवली गोळी

पुन्हा एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याने स्वत:वरच चालवली गोळी

पुन्हा एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याने स्वत:वरच चालवली गोळी

यापूर्वी कर्करोगावर उपचार घेणारे IPS अधिकारी हिंमाशू राय यांनी राहत्या घरी स्वत:वरच गोळी चालवली होती

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 2 सप्टेंबर : एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याने स्वत:वरच गोळी चालवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आरपी शर्मा आहे. त्यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी चालवली आहे. ही गोळी त्यांच्या मानेला लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना कोलंबिया एशिया रुग्णालयात हलविण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना कर्करोगाची लागण झाली होती. त्यांनी अनेक मोठ्या प्रकरणात काम केलं आहे. बीएसवाय मंत्रिमंडळातील गृहमंत्री आणि महसूल मंत्री यांना अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरपी शर्मा यांनी आत्महत्या केली नाही. चुकून गोळी बंदुकीतून सुटल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हेही वाचा- रुग्ण संख्येत वाढ मात्र मृत्यूदर जगात सर्वात कमी, जाणून घ्या कोरोनाची स्थिती यापूर्वी 2018 मध्ये अत्यंत नावाजलेले IPS अधिकारी हिंमाशू रॉय यांनी मुंबईत राहत्या घरी स्वत:वरच गोळी झाडली होती. त्यांनी आपल्या तोंडात गोळी चालवली होती. कर्करोगावरील उपचारादरम्यान त्यांनी स्वत:वर गोळी चालवून आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर सुसाइड नोटही सापडली होती. कर्करोगावर सुरू असलेल्या उपचारामुळे त्रस्त व डिप्रेशनमध्ये असल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं नमूद करण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात