ठाणे, 12 एप्रिल : ‘अजित पवार (ajit pawar) यांना पठ्ठा म्हणायची सवय आहे. तुमच्या माहितीसाठी मी 3 व्हिडीओ आणले आहे. मी केव्हा काय बोललो हे मला नीट आठवतं. मी याच्याआधीही बोललो होतो असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी भरसभेत 3 व्हिडीओ लावून अजित पवारांना जशास तसे उत्तर दिले. तसंच, भोंगे बंद केलेच पाहिजे, आम्ही मागे हटणार नाही, असंही राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला. (raj thackeray thane sabha 2022) ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तरसभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी यांनी पुन्हा एकदा विरोधकांना जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी अजित पवार यांच्या टीकेला राज ठाकरेंनी सणसणीत उत्तर दिले. ‘अजित पवार यांना पठ्ठा म्हणायची सवय आहे. तुमच्या माहितीसाठी मी 3 व्हिडीओ आणले आहे. मी केव्हा काय बोललो हे मला नीट आठवतं. मी याच्याआधीही बोललो होतो. पण, त्याचे मला काही सापडले नाही. काय झालं, सकाळचा शपथविधी झाला, तो पवार साहेबांना कान काही ऐकू येत नाही. तसा त्यांना बॉम्ब फुटल्यानंतर कू असा आवाज येत होता. 28 जुलै 2018 रोजी मी बोललो होतो, असं म्हणत भोंग्याबद्दल व्हिडीओ चालून दाखवला. त्यानंतर 1 ऑगस्ट 2018 रोजी बोललो होतो, त्यावेळीही मी औरंगाबादमध्ये भोंग्याची स्पर्धा सुरू आहे, त्यांना अजान वाचायची असेल तर वाचा, लाऊडस्पिकर कशाला पाहिजे, असा व्हिडीओच लावून दाखवला. लॉकडाऊन लागण्याआधी सुद्धा अधिवेशनामध्ये सुद्धा मशिदीमध्ये भोंगे सुद्धा बंद केले पाहिजे, असं बोलणार व्हिडीओ राज ठाकरेंनी भर सभेत वाजवून दाखवले. ‘लॉकडाऊनमध्ये कान साफ झाला असेल, गुडीपाडव्याचा भोंगा ऐकू आला. मी चुकीचं काय बोललो. मशिदींवरच्या भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठे आला आहे. तुमची प्रार्थना, आम्हाला का ऐकवताय. भोंगे उतरवा हे नीट सांगून समजत नसेल तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार, हा धार्मिक नाही सामाजिक विषय आहे, असंही ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







