जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचेही सर्व कार्यक्रम रद्द, दिल्लीला झाले रवाना

शिंदेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचेही सर्व कार्यक्रम रद्द, दिल्लीला झाले रवाना

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीत असलेल्या शिंदे सरकारचा सर्व कार्यक्रम खोळंबला.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीत असलेल्या शिंदे सरकारचा सर्व कार्यक्रम खोळंबला.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीत असलेल्या शिंदे सरकारचा सर्व कार्यक्रम खोळंबला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 ऑगस्ट : सतत दौऱ्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थकले आहे. त्यामुळे शिंदेंनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून नवी दिल्लीला रवाना झाले आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना आणि शिंदे गटावर सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणी हे ८ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीत असलेल्या शिंदे सरकारचा सर्व कार्यक्रम खोळंबला. एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व कार्यक्रमांना स्थगिती दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर दरम्यान, शिवसेना कुणाची या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही. यावेळी शिवसेनेच्या चिन्हाबद्दल कोणताही निर्णय़ घेऊ नका, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. तसंच, दोन्ही गटांच्या लिखित युक्तिवादावर निर्णय घेतला जाईल, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे निर्णय जाणार की नाही, याबद्दल सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे सरकारने मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लांबणीवर टाकला. संभाव्य मंत्र्यांची यादी समोर दुसरीकडे शिंदे गटामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची हालचाल सुरू आहे. कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होणार आहे. पण त्याआधी मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. तर शिंदे गटातून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहे. जे शिवसेनेमध्ये मंत्री होते त्यांनाच मंत्रिपद दिले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात