सातारा, 15 एप्रिल : शरद पवार (Sharad Pawar) यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक **(Siver Oak)**वर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी अटक केली आणि आज सातारा कोर्टात हजर केल. यावेळी सातारा कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. सातारा कोर्टात काय घडलं? सुनावणी दरम्यान संभाजीराजे आणि उदयनराजे यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर सरकारी वकिल अंजुम पठाण यांनी विरोध केला. खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणात पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या 14 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. वंश भेद, जातीय तेढ निर्माण करण्याचा आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडवन्याचा प्रयत्न सदावर्ते यांच्या कडून होत आहे असा युक्तीवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. वाचा : सदावर्तेंना पुन्हा झटका, आता मराठा समाजाकडून गंभीर आरोप त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी म्हटलं, काहीच रिकव्हरी नाही…सदावर्ते प्रतिष्ठित वकिल… पोलिसांनी दिलेल्या नोटीसीला दिनांक नसल्याचे वकिलांनी सांगितले, त्यामुळे सातारा पोलिसांनी केलेली अटक ही कायदेशीर प्रक्रियेने नाहीये. वृत्त वाहिनीच्या चर्चा सत्रात केलेले वक्तव्य हे कोणाच्या सांगण्यावरून केले आहे? त्याची चौकशी करणे आणि आवाजाची तपासणी या कमी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी म्हटलं, सरकारकडून हे प्रकरण रंगवून पुढे आणले जात आहे. यात राजकीय हस्तक्षेप आहे. गुन्हा दाखल झाल्या नंतर दीड वर्षाने कारवाई का? न्यायालयीन कोठडीची सदावर्ते यांच्या वकिलांची मागणी केली. तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले की, कोरोना काळामुळे दीड वर्ष अटक करू शकता आलेली नाही. या युक्तीवादानंतर सातारा कोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







