आई म्हणाली होती राजकारणात जाऊ नकोस-आदित्य ठाकरे

आई म्हणाली होती राजकारणात जाऊ नकोस-आदित्य ठाकरे

यावेळी अवधूतने आदित्यला लग्नाविषयीही प्रश्न विचारला. यावर मात्र त्याने एखाद्या मुत्सद्दी राजकारण्याप्रमाणे पाॅलिटिकली करेक्ट उत्तर दिलं.

  • Share this:

संगमनेर,17 जानेवारी: काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे आयोजित केलेल्या मेधा महोत्सवात राज्यातील तरुण आमदारांनी तरुणाईशी दिलखुलास संवाद साधवा. यानिमित्ताने महाराष्ट्र घडवण्यासाठी युवा आमदारांची सुरू असलेली तयारी, त्यांचे ध्येय जनतेपर्यंत पोहोचले. या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, आमदार झिशान सिद्धिकी, आमदार आदिती तटकरे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार धीरज देशमुख यांना बोलतं करण्याची जबाबदारी संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते याच्यावर होती. अवधूतने त्याच्या खास स्टाईलमध्ये राजकीय 'खुप्ते तिथे गुप्ते'ची रंगतदार मालिकाच उभी केली.

यावेळी अवधूत गुप्तेने आदित्य ठाकरेंना राजकारणातील पदार्पण आणि निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न केला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी अगदी मुरब्बी राजकारण्याप्रमाणे उत्तरे दिली. आतापर्यंत ठाकरे घराण्यात कोणीच निवडणूक लढवली नसल्याने तुम्ही पहिले ठाकरे निवडणूक लढवत असल्यामुळे आईची प्रतिक्रिया काय होती, असा प्रश्न केला. यावर आदित्य म्हणाले, आईने राजकारणात जाऊ नको, असे सांगितले होते. तुझे बाबा, आजोबा राजकारणात आहेत. तू जाऊ नकोस असे ती अनेकदा सांगायची, असे आदित्य यांनी यावेळी सांगितले. अवधूतने आदित्य यांना लग्नाविषयी प्रश्न केला असता माझी सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे आदित्य यांनी हसत हसत उत्तर दिली.

नवा विचार महाराष्ट्राने दिला असून देशाला पुढे कसं न्यायचं हा विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी स्तुतीसुमनेही उधळली.

दरम्यान, या कार्यक्रमात सहाही आमदार मोकळेपणाने बोलले. महाविकास आघाडी महाराष्ट्रात मोठा बदल, सुधारणा, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असून विकासासाठी एकत्र आल्याचे सूत्र या युवा आमदारांच्या बोलण्यात होते. महाविकास आघाडीत विविध विचारांचे पक्ष एकत्र आले. म्हणूनच आपल्या देशाची लोकशाही व्यवस्था खूप प्रगल्भ आहे. जेथे विविध विचारांची माणसं केवळ विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येतात, आदित्य ठाकरे यांनी म्हणताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी अवधूतने त्याच्या मालिकेनुसार विविध खेळही घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2020 02:29 PM IST

ताज्या बातम्या