Home /News /maharashtra /

अपघातात जखमी झालेल्या पतीला पाहायला जात होती पत्नी; समोरुन येणाऱ्या वाहनाने दिली जोरात धडक आणि...

अपघातात जखमी झालेल्या पतीला पाहायला जात होती पत्नी; समोरुन येणाऱ्या वाहनाने दिली जोरात धडक आणि...

एक महिलेच्या पतीचा आणि सासऱ्याच्या दुचाकीचा अपघात (Accident) झाला होता. यात ते दोन्ही किरकोळ जखमी झाले होते. यानंतर पतीने झालेल्या अपघाताबाबत आपल्या पत्नीला माहिती दिली आणि घरी येण्यास उशीर होईल, असेही सांगितले.

    यवतमाळ, 28 मे : पती-पत्नीचे नाते (Husband Wife Relation) जीवनभराचे असते. मात्र, अनेकदा नियती या पत्नी-पत्नीच्या नात्यामध्ये असे काही घडवून आणते की, सर्वांनाच धक्का बसतो. अशीच एक दुर्दैवी बातमी यवतमाळ (Yawatmal) जिल्ह्यातून समोर आली आहे. अपघात झालेल्या पतीला पाहायला जाणाऱ्या पत्नीसोबत (Wife Accident) ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. सपना रामेश्वर जाधव (रा. फुलउमरी, ता. मानोरा, जि. वाशिम) असे अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे.  सपना जाधव यांच्या पतीचा आणि सासऱ्याच्या दुचाकीचा अपघात (Accident) झाला होता. यात ते दोन्ही किरकोळ जखमी झाले होते. यानंतर पतीने झालेल्या अपघाताबाबत आपल्या पत्नीला माहिती दिली आणि घरी येण्यास उशीर होईल, असेही सांगितले. मात्र, ही घटना ऐकल्यानंतर पत्नी अस्वस्थ झाली. तिला काळजी वाटू लागली. म्हणून ती आपल्या चुलत दिराच्या मोटरसायकलवर पतीला पाहण्यासाठी पुसदकडे निघाली होती. यानंतर रस्त्यात एक दुर्घटना घडली. वाटेत जात असताना तिचा अपघाती मृत्यू (Wife Death in Accident) झाला. समोरुन येणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक - सपना जाधव यांचे पती रामेश्वर जाधव आणि सासरे भारत जाधव हे बाप-लेक दुचाकीने पुसदकडे जात होते. याचदरम्यान, दुचाकी घसरल्याने अपघात झाला. यात ते दोन्ही जण किरकोळ जखमी झाले. यानंतर पुसद येथील दवाखान्यात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती पती रामेश्वर यांनी आपली पत्नी सपना जाधव यांना दिली. (हेही वाचा - मोठी बातमी: प्रवाशांनी भरलेली बस पलटली, अपघातात 25 जण जखमी) पतीचा अपघात झाल्याचे ऐकताच त्यांना धक्काच बसला. यानंतर त्यांना काळजी वाटू लागल्याने त्यांनी पती आणि सासऱ्याला पाहण्यासाठी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. वाटेतच काळाने घातला घाला -  त्यांनी आपल्या चुलत दीर ज्ञानेश्वर याला दुचाकी काढायला सांगितली. यानंतर ते दोन्ही जण पुसदकडे जायला निघाले. मात्र, वाटेतच एक दुर्दैवी घटना घडली. हे दोन्ही जण पुसदकडे जायला निघाले असताना कारोळ ते सोमेश्वर या मार्गावर समोरुन एक वाहन येत होते. या वाहनाने सपना आणि तिचा चुलत दीर बसलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, सपना यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी पतीला पाहण्यासाठी निघालेल्या पत्नीवर काळाने घाला घातला आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bike accident, Death, Road accident, Woman, Yawatmal

    पुढील बातम्या