पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 2 जागीच ठार, 2 जखमी

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 2 जागीच ठार, 2 जखमी

Accident On Pune-Solapur Highway : हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन जण ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहे.

  • Share this:

सुमित सोनवणे, दौंड, 1 मार्च : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बोरीपार्धी हद्दीत विचित्र अपघात (Accident On Pune-Solapur Highway) घडला आहे. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

सोलापूरवरुन पुण्याच्या दिशेने चाललेल्या टाटा टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये टेम्पो दुभाजक ओलांडून पुण्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या बाजूला गेला आणि समोरून आलेल्या दुसऱ्या वाहनाला धडकला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन जण ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहे.

हेही वाचा - पुण्यातील धक्कादायक प्रकार: फेसबुकवर मैत्री करत आर्थिक फसवणूक आणि नंतर अश्लील चाळे, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर दुभाजक ओलांडून अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत असल्याने प्रशासनाने दुभाजकाची उंची वाढवावी, अशी मागणी आता नागरिकांमधून समोर येत आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून महामार्गांवर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. वेगावर नियंत्रण राहत नसल्याने यातील बहुतांश दुर्घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे वाहनचालकांनी भरधाव वेगाचा वापर न करत रस्त्यावरील नियमांचं पालन करण्याची करण्याची गरज वारंवार अधोरेखित होत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 1, 2021, 11:51 PM IST

ताज्या बातम्या