मुंबई, 09 ऑगस्ट : अखेर 39 दिवसांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आज होणार आहे. एकूण 18 जणांची नाव समोर आली आहे. शपथविधी सोहळ्यात भावी मंत्र्यांच्या खुर्च्या लावण्यात आलेले आहे. यामध्ये अब्दुल सत्तार, संजय राठोड यांचे नाव आहे. तर औरंगाबादहून शपथविधीसाठी निघालेले संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांची खुर्चीच लागली नसल्याचे समोर आले आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता काही तास उरले आहे. सकाळी ११ वाजता या भावी मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. एकूण 18 मंत्री शपथ घेणार आहे. या मंत्रिमंडळामध्ये भावी मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
#MaharashtraCabinet | Nine BJP leaders and nine Shiv Sena leaders to take oath today in the state cabinet expansion, in Mumbai pic.twitter.com/XG09h7cMQ8
— ANI (@ANI) August 9, 2022
मंगळवारपर्यंत ९ जण शपथ घेणार अशी शक्यता होती. पण रात्रभरात हालचालींना वेग आला. शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची नावे वाढवणे सुरू आहे. रात्री पर्यंत ८ भाजपा आणि ८ शिंदे शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे फायनल झाली होती. पण रात्री उशिरा अब्दुल सत्तार आणि मंगलप्रभात लोढा यांची नावे वाढवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अब्दुल सत्तार यांचं नाव आल्यामुळे संजय शिरसाट यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. एकूण १८ मंत्री शपथ घेतील शिंदे गटाकडून हे मंत्री घेणार शपथ दादा भुसे संदीपान भुमरे गुलाबराव पाटील उदय सामंत शभुराजे देसाई तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर संजय राठोड भाजपकडून हे नेते घेणार शपथ चंद्रकांत पाटील गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील विजयकुमार गावित सुरेश खाडे अतुल सावे मंगल प्रभात लोढा

)







