Home /News /maharashtra /

पुढच्या वर्षी तरी पायी वारी घडू दे! माऊलींच्या पादुकांच्या प्रवासाचा हा VIDEO उभे करेल रोमांच

पुढच्या वर्षी तरी पायी वारी घडू दे! माऊलींच्या पादुकांच्या प्रवासाचा हा VIDEO उभे करेल रोमांच

आषाढी एकादशी. अवघ्या महाराष्ट्राचा सण. गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या सावटामुळे (Corona) पायी चालत जाणारी हजारो वारकऱ्यांची वारी अनुभवता येत नसली, तरी विठ्ठलाच्या भेटीची आस आणि पंढरीचा ध्यास आवरावा तरी कसा!

पंढरपूर, 19 जुलै : आषाढी एकादशी. अवघ्या महाराष्ट्राचा सण. गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या सावटामुळे (Corona) पायी चालत जाणारी हजारो वारकऱ्यांची वारी अनुभवता येत नसली, तरी विठ्ठलाच्या भेटीची आस आणि पंढरीचा ध्यास आवरावा तरी कसा! हजारो वारकऱ्यांनी एकत्र येणं, पायी चालत जाणं, ठिकठिकाणी मुक्काम करणं कोरोना काळात शक्य होणार नसल्यामुळे माऊलींच्या पालिका यंदाही खास बसमधून (Bus) पंढऱीला पोहोचल्या आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या पादुका घेऊन जाणारी ही बस वारकऱ्यांसाठी एखाद्या दैवतापेक्षा कमी नाही. पालखीवर डोकं ठेवता आलं नाही म्हणून काय झालं, या बसला हात लावून नमस्कार केला, तरी आपल्या भावना संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींपर्यंत आणि पंढरीतील विठ्ठलापर्यंत पोहोचतात, हे वारकऱ्यांनी यंदादेखील दाखवून दिलं. माऊलींच्या पादुका घेऊन जाणाऱ्या बसचं या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जागोजागी स्वागत करण्यात आलं आणि फुलांनी सजवलेल्या या बसचं काही क्षणांपुरतं झालेलं दर्शन वारकऱ्यांना यंदाची वारी घडवून गेलं. हे वाचा - भेटी लागी जीवा लागलीस आस, विठ्ठलाची नगरी सजली PHOTOS विठ्ठल हा पंढरीत असला तरी तो प्रत्येकाच्या हृदयातही असतो, याची अनुभूती या कोरोनानं पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिली. कोरोनाचं संकट टळू दे, मुबलक पाऊस होऊ दे आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा सर्वांना एकत्र भजनं म्हणत, अभंग गात आणि रिंगणांचा आनंद लुटत पंढरीची वारी घडु दे, अशीच प्रार्थना समस्त वारकरी करत आहेत.
Published by:desk news
First published:

Tags: Pandharpur (City/Town/Village)

पुढील बातम्या