पुणे, 12 फेब्रुवारी : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विषयांमुळे जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. आता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरुन वाद सुरू झाला आहे. शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्याला अहिल्याबाई होळकर यांच्या वंशजांनी विरोध केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. (Ahilyabai Holkar's statue)
भूषणसिंहराजे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. उद्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला संभाजीराजे यांनी उपस्थित राहू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. याशिवाय शरद पवारांविषयी बहुजन समाजाचा किती राग आहे याची कल्पना संभाजीराजेंना असेलच. उद्या जेजुरी गडावर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या उद्घाटनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार छत्रपती संभाजीराजे राहणार आहेत.
हे ही वाचा-काँग्रेस खासदाराची जीभ घसरली; नानांच्या सोहळ्यादरम्यान वादग्रस्त शब्दाचा वापर
पुढे भूषणसिंह होळकरांनी पत्रात लिहिल आहे की, शरद पवारांनी पेरलेल्या घाडेरड्या राजकारणाची मुळं जर महाराष्ट्रात रुजत असतील तर याचे दीर्घकालीन परिणाम समाजाला भोगावी लागतील. याची आपणाला जाणीव असेल. याऐवजी शहीद जवानांच्या वीर माता किंवा पत्नी, शेजकरी, मेंढपाळ यांनी हे अनावरण केले असते तर तो मासाहेबांच्या कार्याचा गौरव होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sharad pawar