मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू, बीडमधील दुर्दैवी घटना

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू, बीडमधील दुर्दैवी घटना

झोपेतून उठल्यानंतर शशिकलाबाई यांचा हात भिंतीला लागला असता त्यांना तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसला.

झोपेतून उठल्यानंतर शशिकलाबाई यांचा हात भिंतीला लागला असता त्यांना तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसला.

झोपेतून उठल्यानंतर शशिकलाबाई यांचा हात भिंतीला लागला असता त्यांना तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसला.

बीड, 23 मे : घरात झोपलेले असताना अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली, या दुर्घटनेत मायलेकीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव परिसरात  घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकला शंकरराव फफाळ (वय 65) व सखुबाई शंकरराव (फफाळ वय 45) अशी मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत.  किट्टी आडगाव येथील पाटील गल्ली येथे शशिकलाबाई शंकरराव फपाळ या मुलगी सखुबाई सोबत राहत होती.

विरारमध्ये खदानीत पडल्यानं अज्ञात व्यक्तीचा बुडून मृत्यू, परिसरात खळबळ

शशिकला आणि सखुबाई या मायलेकी घरात झोपल्या होत्या. आज सकाळी 6 वाजता झोपेतून उठल्यानंतर शशिकलाबाई यांचा हात भिंतीला लागला असता त्यांना तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. यावेळी मुलगी सखुबाई आईला काय झाले हे पाहण्यासाठी गेली असता तिला देखील तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. यात दोघी मायलेकी होरपळून जागीच ठार झाल्या. दरम्यान माजलगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तर घराला नेमकी आग कशामुळे लागली ? याचा तपास माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी करत आहे.

क्रिकेटपटूंसोबत लग्न करताच संपलं या अभिनेत्रींचं बॉलिवूड करिअर; कारण...

दरम्यान, पाटील गल्ली येथे मागील आठ दिवसांपासून अनेक घरात विद्युत प्रवाह उतरला असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी महावितरणकडे केल्या होत्या. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न देता दुर्लक्ष केले. यातूनच ही घटना घडली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वारा आणि पाऊस झाला होता. या कालावधीत विद्युत तारा मोठया प्रमाणात अस्ता व्यस्त झाल्यामुळे देखील अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे विद्युत वितरण कंपनीने तात्काळ तारा आणि कनेक्शन वायर दुरुस्त करावेत अशी मागणी सामान्य वर्गातून केली जात आहे.

पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर विद्युत वितरण कंपनीने मोहीम हाती घेणे गरजेच आहे, मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांशी विचारणा केली असता कर्मचारी कमी असल्याचे कारण त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

First published: