एक चूक झाली आणि सांगली जिल्हा पुन्हा भीतीच्या सावटाखाली, विश्वजीत कदमांनी लिहिलं आरोग्यमंत्र्यांना पत्र

एक चूक झाली आणि सांगली जिल्हा पुन्हा भीतीच्या सावटाखाली, विश्वजीत कदमांनी लिहिलं आरोग्यमंत्र्यांना पत्र

सांगली जिल्ह्यातील नागरिक पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

सांगली, 24 एप्रिल : सांगली जिल्ह्यातल्या खेराडे वांगीतील व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याचे सायन हॉस्पिटल प्रशासनाने स्वॅब घेतले होते. मात्र असं असतानाही या व्यक्तीचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बाहेर का काढले? ही हॉस्पिटलची मोठी चूक असल्याचं कृषी राज्यमंत्री आणि कडेगाव तालुक्याचे आमदार विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे. तसंच यासंदर्भात कदम यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव अजय मेहता यांना एक पत्रही लिहिलं आहे.

खेराडे वांगीतील मृत व्यक्तीवर 19 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार होते. मात्र मृत व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह आहे हे रुग्णालय प्रशासनाकडून 22 एप्रिल रोजी सांगण्यात आले. ही माहिती समोर आल्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील नागरिक पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली असल्याचं पाहायला मिळत आहे. याला सायन हॉस्पिटल जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

मुंबईत मरण पावलेल्या खेराडे वांगीतील व्यक्तीची स्वॅब टेस्ट घेऊन देखील त्याचे पार्थिव बाहेर कसे काय काढू दिले? असा प्रश्न करत याप्रकरणी सायन हॉस्पिटल प्रशासनाची चौकशी करा, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडे पत्रातून केली आहे.

हेही वाचा- कोरोनाच्या उपचारासंदर्भात चांगली बातमी, दिल्लीतील चाचणीला आलं मोठं यश

दरम्यान, खेराडे वांगीत अंत्यसंस्कार झालेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज मी तातडीने या परिसराला भेट देऊन प्रशासकीय व्यवस्थांची पाहणी केली. या व्यक्तीशी संबंधित 21 जणांना कडेगांव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. या ठिकाणाची पाहणी केली.या संदर्भात योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र सर्वतोपरीने खबरदारी बाळगावी, असे आवाहन विश्वजीत कदम यांनी केलं आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 24, 2020, 11:52 AM IST

ताज्या बातम्या