मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /एका माशाने मच्छीमार झाला लखपती, जाळ्यात सापडला 22 किलोचा मासा, VIDEO

एका माशाने मच्छीमार झाला लखपती, जाळ्यात सापडला 22 किलोचा मासा, VIDEO

 रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदरावर लावलेल्या जाळ्यात तब्बल 22 किलोचा घोळ मासा 4 मच्छिमारांना सापडला आहे.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदरावर लावलेल्या जाळ्यात तब्बल 22 किलोचा घोळ मासा 4 मच्छिमारांना सापडला आहे.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदरावर लावलेल्या जाळ्यात तब्बल 22 किलोचा घोळ मासा 4 मच्छिमारांना सापडला आहे.

रायगड, 10 ऑगस्ट : पावसाळी हंगाम असल्यामुळे खोल समुद्रात मासेमारी सध्या बंद आहे. पण,  रायगड (raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदरावर लावलेल्या जाळ्यात तब्बल 22 किलोचा घोळ मासा (ghol fish) 4 मच्छिमारांना सापडला आहे. हा मासा तब्बल 2 लाख 61 हजार रुपयांना स्थानिक व्यापाऱ्याने विकत घेतला आहे.

पावसामुळे खोल समु्द्रात मासेमारीसाठी जाता येत नसल्यामुळे काही मच्छीमार समु्द्राच्या किनाऱ्यावर किंवा नदीत जाळे टाकून मासे पकडत असतात. जीवना बंदरावरील मच्छिमार जयेंद्र पाटील, उद्देश पावशे, हेमंत चुनेकर व त्यांचे आणखी एक साथीदार यांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाळी लावून ठेवली होती.

अचानक जाळी जोराने हलली, जाळी ओढून पाहिली असता जड असल्यामुळे ती हलत नव्हती. मोठ्या ताकदीने मच्छिमारांनी जाळी बाहेर खेचून काढली असता भलामोठा घोळ मासा जाळीत सापडल्याचे लक्षात आले. घोळ मासा जाळ्यात लागल्यामुळे मच्छिमारांच्या आनंदाचा पारा उरला नाही.

राहुल गांधींपासून काही अंतरावर बॉम्बस्फोट झाला होता, नाना पटोलेंनी व्यक्त केली

ताबडतोब या मच्छिमारांनी त्याला बाहेर काढले व बंदरावर आणले. त्यानंतर बंदरावर घोळ माशाची बोली लावण्यात आली. श्रीवर्धन येथीलच व्यापारी तोडणकर यांनी हा मासा तब्बल 2 लाख 61 हजार रुपयांना खरेदी केला.

मुंबई किंवा इतर मोठ्या ठिकाणी या माशाला दुप्पट ते तिप्पट भाव मिळण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तविली आहे.  मुंबई बाजारात हा मासा तब्बल 5 ते 6 लाखांना विकला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या माशाची बंदरावर जोरदार चर्चा रंगली आहे.

First published:

Tags: रायगड