जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धुळ्यातील शंकर मार्केटमध्ये अग्नितांडव, अनेक दुकानांना भीषण आग

धुळ्यातील शंकर मार्केटमध्ये अग्नितांडव, अनेक दुकानांना भीषण आग

धुळ्यातील शंकर मार्केटमध्ये अग्नितांडव, अनेक दुकानांना भीषण आग

आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

धुळे, 28 जून : धुळे (dhule) शहरातील पाचकंदील परिसरातील  कापडाच्या मार्केटमध्ये भीषण आग (fire in dhule) लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे अनेक दुकानं भक्षस्थानी सापडली आहे. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पाचकंदील परिसरातील कापडाच्या शंकर मार्केटला (Shankar Market in Dhule) आग लागली. पहाटेच्या सुमारास आगीच्या भडका उडाला. कापडांची दुकानं असल्यामुळे बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केलं. मार्केटमधील इतर दुकानंही आगीच्या भक्षस्थानी सापडली आहे.

जाहिरात

आगीची तीव्रता इतका भीषण आहे की, मार्केटला लागल्या आगीचे दाह आजूबाजू्च्या परिसरात जाणवत आहे. धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  आग विझवण्यासाठी महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागही प्रयत्न करत आहे. परंतु, जुनी बाजारपेठ असल्याने आग विझवण्यात अडचणी येत आहे. अरुंद जागा असल्यामुळे अग्निशमन दलाला अडचणी येत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, शंकर मार्केटमधील अनेक दुकानांना आगीने आपल्या कचाट्यात घेतले आहे. सुदैवाने, अद्याप कोणतीही  जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात