भयंकर! दागिन्यांपुढे माणुसकी हरली; रत्नागिरीत तीन वृद्ध महिलांचा खून करून केलं आगीच्या हवाली
भयंकर! दागिन्यांपुढे माणुसकी हरली; रत्नागिरीत तीन वृद्ध महिलांचा खून करून केलं आगीच्या हवाली
Murder in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली याठिकाणी दोन दिवसांपूर्वी माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरात तीन महिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.
रत्नागिरी, 16 जानेवारी: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली (Dapoli) याठिकाणी दोन दिवसांपूर्वी माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरात तीन महिलांची निर्घृण हत्या (3 old women brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली होती. नराधम आरोपींनी क्रूरतेच्या परिसीमा गाठत तिन्ही वृद्ध महिलांना भयंकर मृत्यू दिला होता. यानंतर आरोपींनी संबंधित वृद्ध महिलांचा मृतदेह जाळला होता. या हत्या मृत महिलांच्या अंगावरील दागिन्यांसाठी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सत्यवती पाटणे (57), पार्वती पाटणे (90) आणि रुक्मिणी पाटणे (80) अशी हत्या झालेल्या वयोवृद्ध महिलांची नावं आहेत. अज्ञात चोरट्यांनी या तिघींची हत्या करून त्यांच्या अंगावरील 1 लाख 62 हजार 150 रुपयांचे दागिने जबरीने चोरून नेल्याची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा-20 वर्षीय तरुणीवर कारमध्ये रेप, निर्जनस्थळी नेऊन शेजाऱ्यानेच दिल्या नरक यातना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथील एकाच घरात तीन वृद्ध महिलांची हत्या करून त्यांना जाळलं होत. दापोली पालगड रस्त्यावर असणाऱ्या वणोशी खोतवाडी या गावात केवळ 25 घरं आहेत. यातील बहुतांशी घरं बंद असून अनेकजण कामानिमित्त मुंबईत स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे गावात सध्या केवळ चार ते पाच कुटुंबेच वास्तव्याला आहेत. दरम्यान ऐन संक्रातीच्या दिवशी या तिन्ही वयोवृद्ध महिलांची अज्ञाताने निर्घृण हत्या केली आहे.
हेही वाचा-टोळक्यानं अपहरण करत 4 दिवस ठेवलं डांबून अन्..; पुण्याला हादरवणारी घटना
दरम्यान घटनेच्या दिवशी सकाळी तिन्ही वृद्ध महिला घराबाहेर आल्या नाहीत. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या इंदूबाई पाटणे यांनी आपल्या कुटुंबीयांसह संबंधित घराची पाहणी केली. यावेळी तीनही महिलांचे मृतदेह घरातील वेगवेगळ्या खोलीत आढळले. एका महिलेचा मृतदेह हा घराच्या हॉलमध्ये तर दुसरा मृतदेह हा बेडरुममध्ये आढळला. तर तिसरा मृतदेह हा किचनमध्ये भयावह स्थिती आढळला आहे. तिन्ही मृतदेहाच्या अंगावर असिड सदृश्य पदार्थ आढळला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.