बेळगाव, 7 ऑक्टोबर : रात्री झालेल्या मुसळधार पावसात (heavy rainfall) मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसात घराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू (7 dead after house wall collapse) झाला आहे. बेळगाव (Balgaum) मधील बादल अंकलगी गावात ही दुर्घटना घडली आहे. बुधवारी रात्री साधारणत: 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृत्यू झालेले सर्वच्या सर्व सातही जण हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बादल अंकलगी गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत घटनास्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतकांमध्ये दोन आठ वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे.
Wall collapsed due to heavy rain. One of the deceased is a baby. Post mortem will be done: MG Hirematt, Deputy Commissioner, Hirebaagewadi Police Station
— ANI (@ANI) October 6, 2021
अंबरनाथमध्ये भिंत कोसळून दोघांचा मृत्यू बुधवारी सायंकाळच्या सुमारास मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस बरसला. याच दरम्यान अंबरनाथमध्ये एक भिंत कोसळली आणि त्याखाली दोघेजण दबले गेले. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळच्या पावसामागे होतं ‘हे’ कारण रायगड जिल्ह्यात बुधवारी ढगांची दाटी झाली होती. रडारच्या क्लिपमधून मिळत असलेल्या माहितीनुसार सुमारे 10 ते 12 किलोमीटर एवढ्या उंचीचे ढग दाटून आले होते. त्याचाच परिणाम म्हणून कमी वेळात जोरदार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी तर ढगफुटीसदृश जोरदार पाऊस पडला. यावेळी वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट अनेक भागात ऐकू आला. रायगड जिल्ह्याला लागून असलेल्या परिसरातही त्याचा परिणाम जाणवला. मुंबई आणि ठाण्यात मेघगर्जनेसह झालेल्या पावसामागेदेखील हेच कारण असल्याचं सांगितलं जात आहे. काही तासांत वीजांसह पाऊस झाला आणि त्यानंतर लगेच थांबल्याचा अनुभव अनेक भागात आला. पुढील पाच दिवस मुसळधार राज्यातील विविध भागात ढगांनी दाटी केली असून वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. विशेषतः किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. वीजांपासून राहा सावध ढगांची दाटी झाल्यामुळे आणि काही ठिकाणी 10 किलोमीटर उंचीपर्यंतचे ढग असल्यामुळे वीजा होत असताना घराबाहेर पडू नका, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी वीज कोसळल्यामुळे जीवितहानी झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस वीजा चमकत असताना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.