Home /News /maharashtra /

संध्याकाळच्या पावसामागे होतं ‘हे’ कारण, पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

संध्याकाळच्या पावसामागे होतं ‘हे’ कारण, पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात रायगड आणि त्याला लागून (Heavy rains with lightening) असलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये अचानक जोरदार पाऊस आणि वीजांचा अनुभव आला

    मुंबई, 6 ऑगस्ट : राज्यात रायगड आणि त्याला लागून (Heavy rains with lightening) असलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये अचानक जोरदार पाऊस आणि वीजांचा अनुभव आला. यामागे असलेल्या भौगोलिक कारणाचा उलगडा झाला असून ढगांच्या (rains due to clouds of 10 to 12 km) अभूतपूर्व दाटीमुळं असा मुसळधार पाऊस कोसळल्याचं दिसून आलं आहे. रडारच्या क्लिपमधून झालं उघड रायगड जिल्ह्यात बुधवारी ढगांची दाटी झाली होती. रडारच्या क्लिपमधून मिळत असलेल्या माहितीनुसार सुमारे 10 ते 12 किलोमीटर एवढ्या उंचीचे ढग दाटून आले होते. त्याचाच परिणाम म्हणून कमी वेळात जोरदार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी तर ढगफुटीसदृश जोरदार पाऊस पडला. यावेळी वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट अनेक भागात ऐकू आला. शेजारी जिल्ह्यांतही परिणाम रायगड जिल्ह्याला लागून असलेल्या परिसरातही त्याचा परिणाम जाणवला. मुंबई आणि ठाण्यात मेघगर्जनेसह झालेल्या पावसामागेदेखील हेच कारण असल्याचं सांगितलं जात आहे. काही तासांत वीजांसह पाऊस झाला आणि त्यानंतर लगेच थांबल्याचा अनुभव अनेक भागात आला. पुढील पाच दिवस मुसळधार राज्यातील विविध भागात ढगांनी दाटी केली असून वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. विशेषतः किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हे वाचा - महाविकास आघाडी सरकारने पुकारला 11 तारखेला महाराष्ट्र बंद वीजांपासून राहा सावध ढगांची दाढी झाल्यामुळे आणि काही ठिकाणी 10 किलोमीटर उंचीपर्यंतचे ढग असल्यामुळे वीजा होत असताना घराबाहेर पडू नका, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी वीज कोसळल्यामुळे जीवितहानी झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस वीजा चमकत असताना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Maharashtra, Monsoon, Rains

    पुढील बातम्या