Home /News /maharashtra /

धक्कादायक! पनवेलमध्ये 62 वर्षीय महिलेची 32 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

धक्कादायक! पनवेलमध्ये 62 वर्षीय महिलेची 32 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

महाराष्ट्रात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटना वाढत आहे. राज्यात कुठल्याही भागातून दररोज एकतरी आत्महत्येची घटना समोर आली आहे.

    प्रमोद पाटील, प्रतिनिधी रायगड, 5 जुलै : रायगड जिल्ह्याच्या पनवेलमधून (Panvel) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वृद्ध महिलेने तब्बल 32 व्या मजल्यावरुन (62 Year old woman suicide) उडी घेत आत्महत्या (Panvel Suicide) केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण घटना - महाराष्ट्रात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटना वाढत आहे. राज्यात कुठल्याही भागातून दररोज एकतरी आत्महत्येची घटना समोर आली आहे. आजसुद्धा पनवेलमध्ये एका 62 वर्षीय महिलेने आत्महत्या करत मृत्यूला कवटाळले. ही घटना पनवेल रसायनी रोडवर असलेल्या इंडिया बुल्स या इमारतीत घडली. इंडिया बुल्स या इमारतीच्या तब्बल 32व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. सुचित्रा साहू असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच या 62 वर्षीय महिलेने आत्महत्या का केली याचा खुलासा अजून झालेला नाही. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. यानंतर पोलीस आत्महत्येचे कारण शोधत आहेत. तर या प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हेही वाचा - उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाइंड लव्ह जिहादचा आरोपी, खा. बोंडे यांचा आरोप, म्हणाले एका विवाहितेला.. पनवेलमध्ये सीएनसी गॅस स्कूल व्हॅनला आग - सीएनजी किट असलेल्या कारने (CNG gas car) रस्त्यावर धावताना पेट घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच एक घटना पनवेलमधून (Panvel CNG gas car) समोर आली आहे. गाडीमध्ये सीएनजी गॅस भरून पेट्रोल पंपाच्या बाहेर निघाल्यावर काही अंतर पुढे गेलेल्या स्कूल व्हॅनने अचानकपणे पेट (School CNG gas fire) घेतला. ही घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. ही घटना नवीन पनवेल उड्डाण पुलाखालच्या रस्त्यावर घडली. नवीन पनवेल उड्डाण पुलाखाली असलेल्या कांडपिळे सीएनजी पंपामध्ये आज दुपारी पाऊणे तीनच्या सुमारास स्कूल व्हॅन गाडी घेऊन चालक गॅस भरण्यासाठी गेला. गॅस भरल्यानंतर सदर गाडी बाहेर काढून चालक थोडा पुढे गेला. मात्र, यावेळी अचानकपणे गाडीने पेट घेतला. यामुळे एकच धावपळ उडाली. सुदैवाने शाळेतली मुले बसमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तर चालकही बाहेर पडल्याने त्यालाही दुखापत झाली नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Panvel, Woman suicide

    पुढील बातम्या