मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रखडलेल्या सहा महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता, प्रभागांची होणार पुनर्रचना

रखडलेल्या सहा महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता, प्रभागांची होणार पुनर्रचना

राज्य सरकारने प्रभाग पद्धतीत बदल केल्यामुळे सहा महानगरपालिकांच्या (6 municipal corporation election might get postponed due to new ward arrangement) निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

  • Published by:  desk news
मुंबई, 23 सप्टेंबर : राज्य सरकारने प्रभाग पद्धतीत बदल केल्यामुळे सहा महानगरपालिकांच्या (6 municipal corporation election might get postponed due to new ward arrangement) निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सरकारने केलेल्या नव्या बदलांनुसार (Changes) मुंबई महानगरपालिकेमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धत कायम असेल. इतर महानगरपालिकांमध्ये मात्र तीन सदस्यीय प्रभाग पद्धत असणार आहे, तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धत अस्तित्वात येणार आहे. या निर्णयामुळे आता निवडणूक आयोगाला नव्याने प्रभागांची रचना करावी लागेल. त्यामुळे कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, कोल्हापूर, वसई विरार आणि औरंगाबाद या महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. प्रभाग पद्धतीचा घोळ प्रभाग पद्धतीत सतत बदल करून घोळ घालण्याची परंपरा महाविकास आघाडीनेही कायम ठेवली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने यात बदल करत एकसदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली. डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात हा बदल करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा सरकारने प्रभाग पद्धतीत बदल केला असून बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली आहे. प्रतिनिधींना कारभार करणं सोपं व्हावं, यासाठी हा निर्णय घेतल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. हे वाचा -Pune Metro Recruitment: पुणे मेट्रो रेल्वेमध्ये तब्बल 96 जागांसाठी मोठी पदभरती ओबीसी आरक्षणासाठी निर्णय? वास्तविक, या महानगरपालिकांमध्ये ओबीसींसाठी आरक्षण लागू व्हावं, यासाठी सरकारनं प्रभाग पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर नुकतीच राज्यपालांनी सही केली आहे. काही दिवसांपासून हा अध्यादेश काढण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र अध्यादेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येत नसल्यामुळे या रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका अध्यादेशापूर्वी जाहीर होऊ नयेत, अशी सरकारची योजना असल्याची चर्चा आहे. प्रभाग रचनेत बदल झाल्यामुळे आता निवडणूक आयोगाला नव्या पद्धतीनुसार प्रभागांची रचना करावी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुका सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Election, Election commission, Muncipal corporation

पुढील बातम्या