जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / '400 ते 500 जणांनी फोन केले आणि...', व्हायरल ऑडिओ क्लिपवर गिरीश महाजनांचं अखेर स्पष्टीकरण

'400 ते 500 जणांनी फोन केले आणि...', व्हायरल ऑडिओ क्लिपवर गिरीश महाजनांचं अखेर स्पष्टीकरण

(CM Eknath Shinde : ठाकरे गट झाला आता राष्ट्रवादी, जिल्हाप्रमुखच मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला, दिली मोठी जबाबदारी)

(CM Eknath Shinde : ठाकरे गट झाला आता राष्ट्रवादी, जिल्हाप्रमुखच मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला, दिली मोठी जबाबदारी)

एका विद्यार्थ्यासोबत भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

  • -MIN READ Dhule,Maharashtra
  • Last Updated :

धुळे, 14 ऑक्टोबर : शिक्षक भरती प्रकरणावरून एका विद्यार्थ्यासोबत भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अखेरीस, या वादावर महाजन यांनी खुलासा केला आहे, कालपासून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. 400 ते 500 लोकांनी मला सारखे फोन केले. पण हा विषय माझ्या खात्यातला नाही. यावर शिक्षण विभाग लवकरच निर्णय घेईल, असं आश्वासन महाजन यांनी दिलं. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर महाजन हे पहिल्यांदाच धुळ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबद्दल गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

‘मला वाटतं खरं, प्रामुख्याने हा विषय माझा नाही. शिक्षक जरी भरायचे असले तरी जिल्हा परिषदमध्ये काम करतात. याबद्दलचा निर्णय हा शिक्षण खाते करत असतं. दीपक केसरकर हे त्या खात्याचे मंत्री आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, हा विषय छोटा आहे. कालपासून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. 400 ते 500 लोकांनी मला सारखे फोन केले. मी त्यांना सांगितलं की, सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिक्षक कमी आहे, याबद्दल चर्चा झाली होती शिक्षण खात्याने याबद्दल मनावर घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ते दोन महिन्यात निर्णय घेणार असं आश्वासन दिलं आहे. सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे’ असं महाजन यांनी सांगितलं. (रश्मी शुक्ला आणि फडणवीस भेटीवर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा, म्हणाले…) ‘मागच्या सरकारच्या काळात या भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता. याची सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे हा विषय लवकरात लवकर, दोन ते तीन महिन्यात आम्हाला विषय मार्गी काढायचे आहे. शिक्षकांच्या भरती करायच्या आहे. त्या शिक्षकांची भरती कशी करायची याबद्दल शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींसोबत चर्चा सुरू आहे, लवकरच यावर निर्णय होईल, असं आश्वासनही गिरीश महाजन यांनी दिलं. तसंच, संजय राऊत यांनी त्यांच्या आईला लिहिलेल्या पत्राबद्दल महाजन यांनी बोचरी टीका केली आहे. ‘संजय राऊत यांना शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचीच अधिक चिंता दिसून येत आहे. कारागृहामध्ये मोबाईलची सुविधा नसल्यामुळे त्यांनी पत्र लिहिलं असेल अशी उपासात्मक टीका महाजन यांनी केली. (CM Eknath Shinde : ठाकरे गट झाला आता राष्ट्रवादी, जिल्हाप्रमुखच मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला, दिली मोठी जबाबदारी) ‘उद्धव ठाकरे हे कधी कोणाला मुख्यमंत्री बनवणार होते तर कधी कोणाला मुख्यमंत्री बनवणार असल्याचं सांगताय. मात्र प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांना स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यामुळे सत्ता गेल्यानंतर ते आता मुख्यमंत्रिपदाच्या नावाने गुदगुल्या करत आहे. सत्ता गेल्यामुळे आता या सर्व गंमतीजमती केल्या जात असल्याची टीका महाजन यांनी केली. ‘खडसेंनी यांनी आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यांनी केलेले अनेक पराक्रम आता समोर येत आहेत. पक्षात जाती पातीच्या आधारे नव्हे तर गुणांच्या आधारे संधी दिली जाते, असे सांगत खडसेच्या टिकेला महाजनांनी उत्तर दिले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात