मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोलापुरात महिलेची हत्या करून मृतदेह फेकला झुडपात; पोटचा लेक गायब असल्यानं गूढ वाढलं

सोलापुरात महिलेची हत्या करून मृतदेह फेकला झुडपात; पोटचा लेक गायब असल्यानं गूढ वाढलं

Murder in Solapur: सोलापुरात एका 40 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या (woman brutal murder) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

सोलापूर, 12 ऑक्टोबर: सोलापुरात एका 40 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या (woman brutal murder) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मारेकऱ्यांनी निर्घृण पद्धतीने हत्या करून महिलेचा मृतदेह एका झुडुपात फेकला (dead body thrown into bush) होता. घटनेच्या तीन दिवसांनंतर हत्येचं हे प्रकरण समोर आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मृत महिलेचा मुलगा देखील गेल्या तीन दिवसांपासून गायब आहे. त्यामुळे महिलेच्या हत्येप्रकरणाचं गूढ वाढलं आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे.

रुक्मिणी फावडे असं हत्या झालेल्या 40 वर्षीय महिलेचं नाव आहे. त्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील वाणी फ्लॉट परिसरातील रहिवासी आहेत. तीन दिवसांपूर्वी अज्ञात मारेकऱ्यांनी रुक्मिणी यांची निर्घृण हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपींनी रुक्मिणी यांचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असणाऱ्या एका झुडपात फेकला आहे. तीन दिवसांनंतर हत्येची ही घटना उघडकीस आली आहे.

हेही वाचा-16 वर्षीय युवकाची धावत्या ट्रेनसमोर उडी; सुसाइड नोटमधून PM मोदींकडे अखेरची मागणी

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, मृत महिलेच्या घराला गेल्या तीन दिवसांपासून कुलूप असून त्यांचा मुलगा गायब आहे. त्यामुळे संबंधित महिलेची हत्या तिच्या मुलानेच केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Murder Mystery, Solapur