मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: एका क्षणात होत्याचं झालं नव्हतं; आईजवळ खेळणाऱ्या चिमुकल्याची बिबट्यानं केली भयावह अवस्था

VIDEO: एका क्षणात होत्याचं झालं नव्हतं; आईजवळ खेळणाऱ्या चिमुकल्याची बिबट्यानं केली भयावह अवस्था

सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील एनके गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका चार वर्षांच्या बालकावर बिबट्याने अचानक हल्ला (Leopard attack on minor boy) केला आहे.

  • Published by:  News18 Desk
कराड, 15 नोव्हेंबर: सातारा (Satara) जिल्ह्याच्या कराड (Karad) तालुक्यातील एनके गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका चार वर्षांच्या बालकावर बिबट्याने अचानक हल्ला (Leopard attack on minor boy) केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला (minor boy died in leopard attack) आहे. मृत मुलाची आई शेतात ऊस तोडणी करत असताना, संबंधित चार वर्षांचा मुलगा आपल्या आईच्या आसपासचं खेळत होता. यावेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक चिमुकल्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. चार वर्षाच्या पोटच्या लेकराला डोळ्यादेखत बिबट्यानं उचलून नेल्यानं मातेनं हंबरडा फोडला आहे. आईनं आरडाओरडा केल्यानंतर, आसपासचे लोकं मदतीला येईपर्यंत बिबट्यानं चिमुकल्याचा फडशा पाडला आहे. संबंधित मुलगा उसाच्या शेतात मृतावस्थेत आढळून आला आहे. त्यांच्या मानेवर आणि अन्य शरीरावार बिबट्याने चावा घेतलेल्या अनेक जखमा आढळल्या आहे. ही घटना उघडकीस येताच, गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चिमुकल्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे एनके गावात बिबट्याची दहशत पसरली असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आईच्या जवळूनच बिबट्याने मुलाला उचलून नेल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आकाश बिल असं मृत बालकाचं नाव आहे. पोटच्या लेकराचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हेही वाचा- VIDEO: धाडस दाखवत वडिलांनी बिबट्याच्या जबड्यातून चिमुकल्याची केली सुटका, मुंबईतील थरारक घटना दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी मुंबईतील गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनीत राहणाऱ्या एका 8 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला (Leopard attack on minor boy) केला होता. संबंधित मुलाच्या वडिलांनी प्रसंगावधान दाखवत बिबट्याच्या जबड्यातून आपल्या मुलाची सुटका केली होती. संबंधित मुलगा दुकानात जाऊन परत येत होता. दरम्यान बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला. चिमुकल्या रोहितचा किंचाळण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याच्या जबड्यातून आपल्या मुलाची सुटका केली होती.
First published:

Tags: Leopard, Satara

पुढील बातम्या