जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 30 फुटांवरून चिमुरडी पडली अन् बाईकवर आदळली, नंतर ताटकन पोरगी उभी राहिली VIDEO

30 फुटांवरून चिमुरडी पडली अन् बाईकवर आदळली, नंतर ताटकन पोरगी उभी राहिली VIDEO

(वाशिममधील घटना)

(वाशिममधील घटना)

खेळता खेळता ती ग्रीलवर उभी राहिली आणि तोल गेल्यामुळे ती सरळ खाली कोसळली.

  • -MIN READ Washim,Maharashtra
  • Last Updated :

किशोर गोमाशे, प्रतिनिधी वाशिम, 26 एप्रिल : ‘देव तारी त्याला कोण मारी’ असं आपण नेहमी म्हणत असतो. पण, अशीच एक घटना वाशिममध्ये घडली आहे. वाशिममधील रिसोड शहरातील घराच्या गॅलरी मधून एक 4 वर्षीय मुलगी पडली. सुदैवाने ही मुलगी दुचाकीवर पडल्यामुळे सुखरूप बचावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाशिमच्या रिसोड शहरातील महानंदा कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

जाहिरात

4 वर्षांची मुलगी सायंकाळी घरातून खेळत घराच्या गॅलरीमध्ये आली होती. खेळता खेळता ती ग्रीलवर उभी राहिली आणि तोल गेल्यामुळे ती सरळ खाली कोसळली. जवळपास 30 फूट खाली कोसळली मात्र खाली असलेल्या मोटार सायकलवरील सीटवर ती पडली. (OMG! राजकुमारची 18 लाखांची आलिशान गाडी गाढवांनी ‘पळवली’; नेमकं प्रकरण काय पाहा VIDEO) या घटनेत तिला कोणतीही दुखापत झाली नाही. ही मुलगी खाली पडताच ताटकन उभी राहली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  मुलगी खाली पडल्यानंतर शेजाऱ्यांनी ही बाब तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी लगेच खाली धाव घेऊन तिला जवळ घेतलं. सुदैवाने मोटारसायकलवर मुलगी पडल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: washim
  • First Published :
जाहिरात
जाहिरात