मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /एकनाथ खडसेंचा भाजपला मोठा धक्का, जयंत पाटलांच्या उपस्थितीत नगरसेवकांची 'मेगाभरती'

एकनाथ खडसेंचा भाजपला मोठा धक्का, जयंत पाटलांच्या उपस्थितीत नगरसेवकांची 'मेगाभरती'

या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. याआधीही भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. याआधीही भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. याआधीही भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

इम्तियाज अली, प्रतिनिधी

भुसावळ, 14 फेब्रुवारी : राष्ट्रवादीमध्ये (NCP) दाखल झाल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांचा भाजपला  (BJP) धक्के पे धक्का देण्याचे काम सुरूच आहे. आता तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत भाजपच्या 18 विद्यमान नगरसेवक आणि 13 माजी नगरसेवकांनी सहकुटुंब राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपला आतापर्यंतच सर्वात मोठा धक्का समजला जात आहे.

एकनाथ खडसे यांचा करिष्मा आता दिसू लागला आहे. त्यांच्या समर्थकांनी भाजप’ला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. भाजपला पहिला मोठा धक्का खडसेंनी दिला आहे. भुसावळमधील 18 विद्यमान नगरसेवक व 13 माजी नगरसेवक व कुटुंबीयांनी जळगाव येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात प्रवेशाचा कार्यक्रम झाला. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत एकूण 31 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले मफलर घालून प्रवेश केलेल्या नगरसेवकांचा सत्कार केला.  भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ.सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ.भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे, माजी नगसेवक व आजी माजी नगरसेवक प्रवेश केला.

या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. याआधीही भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

दरम्यान, यावेळी बोलत असताना जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांच्यामुळे भाजप हा बहुजनांचा पक्ष आहे म्हणून अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे महाराष्ट्रात प्रतिसाद त्यांना मिळायला लागला त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करता आली' असं जयंत पाटील म्हणाले.

स्वातंत्र्यापासून असं लोकांना वाटायचं की, हे भाजपवाले पुंजी पंती लोकांचं हित संपादन करतील साधतील मात्र दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून देशात कंपन्या मल्टिनॅशनल कंपन्या शेतकऱ्यांच्या संबंधित मदत करण्याचे कायदे भुमिका व्हायला लागेली आणि दुसरीकडे मात्र  भांडवलदारांना,कारखानदारा मधील कामगारांना काढून टाकण्याचा अधिकार कारखानदाराकडे या मोदी सरकारने दिले आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

2024 नंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर 90 टक्के कामगार कायदे मोडीत निघतील, कामगारांना युनियन करता येणार नाही. देशातल्या कोणत्याच  कामगाराला आपल्या हिताचे संरक्षण करण्याकरिता कायदे करता येणार नाही, अशी व्यवस्था मोदी सरकारने केली आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

First published: